ETV Bharat / international

यूकेमध्ये 24 तासांत 53 हजार 285 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 613 मृत्यूंची नोंद

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेली 53 हजार 322 नवी प्रकरणे समोर आली आहेत. यासह देशातील एकूण रुग्णांची संख्या 25 लाख 42 हजार 65 वर पोचली आहे. राष्ट्रीय सांख्यिकीच्या ब्रिटिश कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, या विषाणूच्या नवीन स्ट्रेनमुळे इंग्लंडमध्ये बाधित रुग्णांची संख्या 63 टक्क्यांनी आणि लंडनमध्ये 77 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

ब्रिटन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण न्यूज
ब्रिटन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण न्यूज
author img

By

Published : Jan 2, 2021, 6:06 PM IST

लंडन - ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेली 53 हजार 322 नवी प्रकरणे समोर आली आहेत. यासह देशातील एकूण रुग्णांची संख्या 25 लाख 42 हजार 65 वर पोचली आहे. यूकेमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे झालेल्या 613 नवीन ​​मृत्यूंसह मृतांची संख्या 74 हजार 125 वर पोचली आहे, अशी माहिती वृत्तसंस्था सिन्हुआने दिली आहे.

ब्रिटनमध्ये कालच 55 हजार 892 नवीन कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळले होते. गुरुवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, महामारीमध्ये आतापर्यंत ही देशातील रुग्णसंख्येतील दिवसाला झालेली सर्वाधिक वाढ आहे. तसेच, मागील सलग चार दिवसांपासून दिवसाला 50 हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत.

हेही वाचा - नवीन कोरोना विषाणूचा शिरकाव झालेले फ्लोरिडा हे अमेरिकेतील तिसरे राज्य

ब्रिटिश सरकारच्या सल्लागारांनी नवीन कोविड-19 विषाणू समोर आल्यानंतर याच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यालये, शाळा आणि सर्व गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक केले असताना ही नवीन आकडेवारी समोर आली आहे. हा नवीन प्रकार 70 टक्के वेगाने पसरतो.

राष्ट्रीय सांख्यिकीच्या ब्रिटिश कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, या विषाणूच्या नवीन स्ट्रेनमुळे इंग्लंडमध्ये बाधित रुग्णांची संख्या 63 टक्क्यांनी आणि लंडनमध्ये 77 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

बिहेवियरल सायन्स ग्रुपने अ‌ॅडव्हायझरी ग्रुप ऑफ इमर्जन्सीजकडे (एसएजी) दिलेल्या अहवालानुसार, नवीन कोरोना विषाणूचा धोका टाळण्यासाठी सामाजिक अंतर आणि स्वच्छताविषयक उपाय कठोर करणे आवश्यक आहे.

लंडन आणि इंग्लंडच्या बर्‍याच भागांमध्ये आधीच सर्वात कडक टायर-4 निर्बंध घातले गेले आहेत. त्यामुळे रहिवाशांना घरांमधून बाहेर पडण्यासाठी फार कमी सूट दिली आहे.

हेही वाचा - न्यूयॉर्क शहरात 14 मार्च हा कोविड-19 स्मृतिदिन म्हणून पाळला जाणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.