ETV Bharat / international

इटलीमध्ये केबल-कार कोसळली; १४ जणांचा मृत्यू

author img

By

Published : May 24, 2021, 10:04 AM IST

या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये इस्राईलच्या सहा जणांचा समावेश होता. त्यांपैकी एकाच कुटुंबातील चार जण इटलीमध्येच राहत होते, अशी माहिती इस्राईलच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली. इतर बळींबाबत मात्र कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

14 killed in Italy cable car crash
इटलीमध्ये केबल-कार कोसळली; १४ जणांचा मृत्यू

रोम : उत्तर इटलीमधील एका प्रसिद्ध पर्यटनस्थळी केबल-कारचा अपघात होऊन, १४ लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या अपघातात एक लहान मुलगा मात्र आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. या मुलाला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये इस्राईलच्या सहा जणांचा समावेश होता. त्यांपैकी एकाच कुटुंबातील चार जण इटलीमध्येच राहत होते, अशी माहिती इस्राईलच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली. इतर बळींबाबत मात्र कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

स्ट्रेसा शहरामध्ये हा अपघात झाला. याबाबत शहराच्या मेयर मार्सेला सेवेरिनो यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकांना पर्वतावर नेणाऱ्या या कारची केबल तुटल्याने ही दुर्घटना घडली. केबल तुटल्यानंतर ही कार गडगडत खाली गेली, ज्यामुळे आत बसलेल्या लोकांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. यामध्ये काही लोक कारच्या बाहेरही फेकले गेले होते, असेही मार्सेला यांनी सांगितले.

यानंतर इटली सरकारने या अपघाताची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. केबल कार आणि इतर वाहतुकीच्या साधनांची तपासणीही ही समिती करणार आहे.

हेही वाचा : चीनचे 'झुरॉंग' मंगळावर उतरले; कामकाजालाही केली सुरुवात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.