टोकिया - जपानमध्ये नवीन पतंप्रधान निवडीच्या घडामोडींना वेग आला आहे. योशिहिडे सुगा यांची जपानच्या सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखपदी निवड झाली आहे. त्यामुळे जपानचे पंतप्रधानपदी होण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
योशिहिडे सुगा यांना सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या निवडणुकीत ३७७ मते मिळाली आहेत. सुगा यांच्या दोन प्रतिस्पर्ध्यांना पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीत १५७ मते मिळाली आहेत. सत्तारूढ पक्षाच्या मतदानात ४०० लोकप्रतिनिधींना आज दुपारी सहभाग घेतला होता.
योशिहिडे सुगा हे पंतप्रधान शिंजो आबे यांचे उत्तराधिकारी ठरले आहेत. शिंजो आबे यांनी आरोग्याच्या कारणांमुळे राजीनामा देणार असल्याचे ऑगस्टमध्ये जाहीर केले आहे.
सध्या, योशिहिडे सुगा हे आबे यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मुख्य सचिव आहेत. सुगा हे पंतप्रधान नियुक्तीनंतर आबे यांचे धोरण सुरूच ठेवणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोनाच्या लढ्याला आणि महामारीत अर्थव्यवस्थेला सुरळीत करण्याला प्राधान्य असल्याचे योशिहिडे सुगा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चीनची समुद्रातील घुसखोरी आणि टोकियो ऑलिम्पिक यावरही नवीन पंतप्रधानांना निर्णय घ्यावे लागणार आहेत.