ETV Bharat / international

जगभरात कोरोना लस पोहचवण्याासाठी युनिसेफची मोहिम - कोरोना महामारी

जगभरातील गरीब विकसनशील देशांना वेळेवर कोरोनाची लस, औषधे आणि आरोग्यविषयक सुविधा मिळाव्या म्हणून युनिसेफने मोहिम सुरू केली आहे.

युनिसेफ
युनिसेफ
author img

By

Published : Feb 17, 2021, 8:00 AM IST

नवी दिल्ली - जगभरातील गरीब आणि विकसनशील देशांना लवकरात लवकर कोरोनाची लस, औषधे आणि आरोग्यविषयक सुविधा मिळाव्या म्हणून युनिसेफने मोहिम सुरू केली आहे. त्यानुसार विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांशी सहकार्य करार करण्यात आला आहे. लस आणि औषधे प्राधान्यक्रमाने विविध देशात पोहचवण्यात येणार आहे.

कोव्हॅक्स लसीकरण मोहिम -

दहा विमान कंपन्यांशी याबाबत करार केल्याची माहिती युनिसेफने दिली. १०० पेक्षा जास्त देशांना विमानांद्वारे मदत करण्यात येईल. कोरोना लस विकत घेऊन जगभरात पोहचवण्यासाठी 'कोव्हॅक्स' हे अभियान युनिसेफने सुरू केले आहे. या अभियानानुसार विविध फार्मा कंपन्या आणि देशांकडून लस विकत घेण्यात येत आहे. १४५ देशांतील सुमारे ३ टक्के नागरिकांना पहिल्यांदा लस देण्यात येणार आहे. यावर्षीच्या जून महिन्यापासून लसीकरण अभियान सुरू करणार असल्याचे युनिसेफने म्हटले आहे.

कोरोना महामारीमुळे जगभरातील आरोग्य व्यवस्थेपुढे संकट उभे राहिल्याचे आपण २०२० वर्षात पाहिले. मात्र, २०२१ वर्षात सुमारे १ कोटी बालके कुपोषणाच्या खाईत लोटले जातील असे, युनिसेफने वर्षाच्या सुरुवातीला म्हटले होते. नायजेरीया, दक्षिण सुदान, येमेनसह आफ्रिका खंडातील देशांमध्ये कुपोषणाचा प्रश्न गंभीर होणार असल्याचे संघटनेने म्हटले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.