मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाचा सोहेल कासकरला परत ( Dawood Ibrahims nephew sohail kaskar ) आणण्याचा मुंबई पोलिसांचा प्रयत्न अयशस्वी झाला. नार्को टेररिझमच्या आरोपाखाली अमेरिकन एजन्सींनी अटक केलेला सोहेल कासकर आता पाकिस्तानात परतला ( Dawood Ibrahim's Nephew Escapes ) असल्याची माहिती मुंबई पोलीस सूत्रांनी दिली आहे. त्याचवेळी अमेरिकन एजन्सींनी सोहेलसह अटक केलेल्या अली दानिशला भारतात आणण्यात यश आले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सोहेलला भारतात आणण्याची तयारी केली होती. मात्र त्याला यश आले नाही.
अमेरिकेने कासकरला सोडून दिले -
सूत्रांनी सांगितले की अलीकडेच एका इंटरसेप्शनमध्ये भारतीय तपास यंत्रणांना सोहेल कासकरचा आवाज ऐकू आला होता, त्यानंतर एजन्सींनी तपास सुरू केला त्यानंतर तो अमेरिका सोडून दुबईमार्गे पाकिस्तानात पोहोचल्याचे समजले. अमेरिकेने सोहेल कासकरला भारताकडे सोपवण्याऐवजी त्याला सोडून दिले त्यानंतर काय झाले हे अद्याप पोलिसांना समजू शकलेले नाही.
दाऊदचा भाऊ नूराचा मुलगा सोहेल -
त्यानंतर मुंबई पोलीस त्याला भारतात आणण्यासाठी सतत प्रयत्न करत होते. मात्र मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोहेल कासकर हा आता पाकिस्तानात परतला आहे. अमेरिकन एजन्सीने सोहेल बरोबर अटक केलेल्या दानिश अलीला भारतात आणण्यात यश आले होते. त्यानंतर मुंबई पोलीस सोहेलला भारतात आणण्याची तयारी करत होते. भारतीय पोलिसांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. सोहेल हा दाऊद इब्राहिमचा भाऊ नूरा कासकरचा मुलगा आहे. नूराचा 2010 मध्ये पाकिस्तानमध्ये मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला होता.
अनेक प्रश्न उपस्थित -
अलीकडेच मुंबई पोलिसांना सोहेल कासकर हा दुबईमार्गे पाकिस्तानात परतल्याचे समजले होते. त्यानंतर पोलिसांनी अमेरिकन एजन्सीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मुंबई पोलीस आणि अमेरिकन एजन्सी यांच्यात समन्वयाच्या अभावावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच अमेरिकेच्या एजन्सीने सोहेल कासकरला भारताकडे न सोपवता त्याला सोडून का दिले असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.
सोहेलला दक्षिण आफ्रिकेत हिऱ्यांच्या तस्करीप्रकरणी अटक -
अली दानिशचे वडील दिल्लीतील जामा मशिदीत काम करायचे. त्याच्या दोन भावांपैकी एक डॉक्टर आहे. जो रशियामध्ये प्रॅक्टिस करतो आणि दुसरा भाऊ सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणारा ज्येष्ठ वकील आहे. मुंबई पोलीस सूत्रांनी सांगितले की, 2001 मध्ये दानिश दुबईला गेला. जिथे तो सोहेल कासकरला भेटला. तिथे ते दोन ते तीन वर्षे एकत्र होते आणि त्यानंतर सोहेलने दानिशला हिरे तस्करीच्या कामाबद्दल सांगितले आणि ठरवले की तो रशियाला जाईल जिथे हिऱ्याच्या अनेक खाणी आहेत. दानिशने खूप प्रयत्न केले पण त्याला रशियाचा व्हिसा मिळत नव्हता. त्यानंतर 2003-04 मध्ये तो अभ्यासाच्या नावाखाली स्टुडंट व्हिसा घेऊन रशियाला गेला. जिथे त्याने दोन वर्षे शिक्षण घेतले आणि त्यानंतर त्याने हिऱ्यांच्या जगात आपले पाय रोवले. त्याचवेळी सोहेलला दक्षिण आफ्रिकेत हिऱ्यांच्या तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली होती आणि या आरोपात तो सुमारे एक वर्ष तुरुंगात होता तुरुंगातून सुटल्यानंतर सोहेल आणि दानिश यांनी मिळून शस्त्रास्त्रांची तस्करी सुरू केली होती.
हेही वाचा - Bulli Bai Case : आरोपींची पोलीस कोठडी संपली; आज जामीन अर्जावर सुनावणी