नवी दिल्ली - पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांनी अफगाणिस्तानात हजारो अतिरेकी पाठविल्याबद्दलचा रिपोर्ट संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने नुकताच सादर केला आहे. अफगाणिस्तानात पाकिस्तानचे 40 हजाराहून अधिक दहशतवादी असून सर्व दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्येच प्रशिक्षण देण्यात आल्याचे गेल्यावर्षी इम्रान खान यांनी कबूल केल्याचे रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालाचा उपयोग पाकिस्तानला बदनाम करण्यासाठी केला जात आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या एनलिटिकल सपोर्ट एंड सेंक्शन मॉनिटरिंग टीम केवळ इम्रान खान यांच्या विधानाची पुनरावृत्ती केली आहे, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
पाकिस्तान अजूनही 30,000 ते 40,000 अतिरेकी असून त्यांनी इतर देशांवर दहशतवादी हल्ले करण्यासाठी पाकिस्तानचा वापर केला होता. हे पाकिस्तानी नेतृत्वाने मान्य केले होते. हे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे लक्षात ठेवण्याची गरज आहे, असे एका अधिकाऱ्यांने म्हटलं आहे. गेल्या महिन्यात संयुक्त राष्ट्राने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले की, अफगाणिस्तानात विदेशी अतिरेक्यांमध्ये साडेसात हजार पाकिस्तानी नागरिक आहेत.