काबूल - अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील तखार प्रांतातील एका मशिदीवर हवाई हल्ला झाल्याची घटना घडली. त्यात 12 लहान मुले ठार आणि अनेक लोक जखमी झाले. संबंधित अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
प्रांताचे नगरसेवक मोहम्मद आजम अफझली म्हणाले की, हा हल्ला 21 ऑक्टोबर रोजी बहराक जिल्ह्यात झाला होता. तिथे तालिबान सैनिकांनी आधीच 40 पेक्षा जास्त अफगाण सुरक्षा दलांना ठार केले होते. प्रांतीय राज्यपालांच्या प्रवक्त्यानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
हेही वाचा - अफगाणिस्तानात गेल्या महिन्यात झालेल्या हिंसाचारात 180 नागरिक ठार, 375 जखमी
अफझली म्हणाले की, 'विमानातून मशिदीवर बॉम्बहल्ला करण्यात आला. यामध्ये तालिबान दहशतवाद्यांचा समावेश होता. ते सुरक्षा दलांवर झालेल्या रक्तरंजित हल्ल्यातही सहभागी होते.' दहशतवाद्यांनी या पूर्वीच मशीद सोडली होती, असे अफझली आणि सुरक्षा सूत्रांनी सांगितले.
सरकार आणि तालिबान प्रतिनिधी यांच्यात शांतता चर्चा सुरू असूनही हिंसाचार झाल्याचे गांधार आरएफईने कळविले आहे.
तालिबानी बंडखोरांनी आतापर्यंत युद्धबंदी स्वीकारलेली नाही. विशेष तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की, युद्धबंदीवर सहमती होण्यापूर्वी दीर्घकालीन चर्चा होईल. शांतता चर्चेदरम्यान देशभर संघर्ष सुरू आहे. एका आठवड्यापासून दक्षिण अफगाणिस्तानात सुरू असलेल्या संघर्षात 100 हून अधिक नागरिक ठार झाले आहेत. तर, काही हजार लोकांना त्यांच्या खेड्यांमधून बाहेर काढण्यात आले आहे.
हेही वाचा - अल कायदाची तालिबानशी जवळीक राहणारच - संयुक्त राष्ट्र अधिकारी