कराची (पाकिस्तान) - दोन रेल्वे एकमेकांवर आदळल्याने अपघात झाल्याची घटना पाकिस्तानच्या दक्षिण सिंध प्रांतात घडली. या दुर्घटनेत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 50 जण जखमी झाले आहेत. हा अपघात घोटकी जिल्ह्यातील धरकी शहराच्या जवळ घडला.
प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सर सय्यद एक्सप्रेस रेल्वे (लाहोर ते कराची) ही रुळावरून घसरल्यानंतर सरगोधाकडे जाणारी मिल्लट एक्स्प्रेसवर ती धडकली. यामुळे मिल्लत एक्सप्रेसचे डबे पलटी झाले. घोटकीचे उपायुक्त उस्मान अब्दुल्ला यांनी सांगितले की, मृतांची संख्या वाढू शकते. पलटी झालेल्या झालेल्या डब्याखाली आणखी काही जण दबल्याची शक्यता आहे. 13 ते 14 डबे रुळावरुन घसरले आहेत. त्यातील, सहा ते आठ डबे पूर्णपणे नष्ट झाल्याची माहितीही त्यांनी दिली.