काबूल - तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये सर्व बाजूंनी प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. ही माहिती अफगाणिस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाने दिली आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी तालिबानला आक्रमकता थांबवण्याचे आवाहन केले आहे. तसेच अफागाणिस्तानच्या शेजारी देशांना आपल्या सीमा निर्वासितांसाठी खुल्या ठेवण्याचा आग्रह केला आहे.
अफगाणिस्तानमधील काबूल वगळता मोठ्या सर्व शहरांवर तालिबानाने ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तान सरकारच्या हातून हळूहळू एक-एक शहरं निसटले आहे. मझार-ए-शरिफ आणि जलालाबाद ही शहर तालिबानच्या ताब्यात आहेत.
सध्या अफगाणिस्तानमध्ये भंयकर स्थिती निर्माण झाली आहे. जवळपास 400,000 नागरिकांना त्यांचे घर-दार सोडावे लागले आहे. यातील काही जणांनी काबूलमध्ये आश्रय घेतला आहे. राजधानी काबूल तालिबानच्या ताब्यातून वाचवली जाईल, अशी आशा त्यांना आहे. मात्र, काबूलही तालिबानीच्या ताब्यात जाईल, असे दिसत आहे.
राजधानी काबूलमध्ये अमेरिकेसह अनेक देशांची दूतावास कार्यालये आहेत. अशा परिस्थितीत अनेक देशांनी दूतावास सोडण्याची तयारी सुरू केली आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानातील आपल्या दूतावासातील कर्मचारी नागरिकांना सुरक्षित परत आणण्यासाठी 3 हजार सैन्य पाठवले आहे. तर ब्रिटननेदेखील 600 कमांडो अफगाणिस्तानमध्ये पाठवले आहे. दरम्यान, तालिबानी प्रवक्त्याने इतर देशांचे दुतावास किंवा त्यांच्या नागरिकांना लक्ष्य करणार नसल्याचे आश्वासन दिले आहे.
हेही वाचा - कंदाहार, हेरातवर तालिबानचा ताबा; दोन तृतीयांश अफगाणिस्तान सरकारच्या हातातून निसटले!
हेही वाचा - तालिबानी दहशतावाद्यांचा पराभव करण्याकरिता अफगाण सरकारने 'हा' आखला प्लॅन
हेही वाचा - "हे युद्ध आता अफगाणिस्तानचे आहे", पेंटागॉनची तालिबानवर हवाई हल्ले न करण्याची भूमिका
हेही वाचा - पुलित्झर पुरस्कार प्राप्त भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकी अफगाणिस्तानात ठार