कराची - पाकिस्तानातील कराची शहरामध्ये वर्दळीचे ठिकाण असलेल्या स्टॉक एक्सचेंजवर दहशतवादी हल्ला झाला आहे. आज सकाळी करण्यात आलेल्या या जीवघेण्या हल्ल्यात एकूण नऊ नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.
या चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. जखमींमध्ये इमारतीच्या बाहेर तैनात असलेला एक पोलीस अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे. चौघांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. घटनास्थळावरून एके-४७ रायफल्स, हॅन्ड ग्रेनेड्स, मॅगझिन्स आणि अन्य स्फोटकं जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मोठ्या हल्ल्याच्या तयारीने आतेरिकी आल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिलीय.
स्टॉक एक्सचेंज इमारतीच्या कंपाऊंडवरील हल्ला अयशस्वी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार सुरक्षा रक्षक आणि एक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानचे 'वॉल स्ट्रीट' असलेल्या चंद्रीगर रस्त्यावर संबंधित हल्ला झाला आहे.
बलूचिस्तान लिबरेशन आर्मीशी (बीएलए) जोडलेल्या माजिद ब्रिगेडने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. गेल्या वर्षी ग्वादरमध्ये झालेल्या पर्ल कॉन्टिनेंटल हॉटेल हल्ल्यात देखील आठ जण ठार झाले होते. हल्लेखोर स्वयंचलित शस्त्रास्त्रांनी सज्ज होते, असे वरिष्ठ पोलीस अधिकारी शरजील खरल यांनी सांगितले. तसेच नागरिकांना ओलीस ठेवून सरकारी यंत्रणांना धारेवर धरण्याच्या तयारीत हल्लेखोर असल्याचे ते म्हणाले.
-
Security forces kill all 4 terrorists who attacked Pakistan Stock Exchange in #Karachi: Pakistan media pic.twitter.com/Dgz8HGCmhp
— ANI (@ANI) June 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Security forces kill all 4 terrorists who attacked Pakistan Stock Exchange in #Karachi: Pakistan media pic.twitter.com/Dgz8HGCmhp
— ANI (@ANI) June 29, 2020Security forces kill all 4 terrorists who attacked Pakistan Stock Exchange in #Karachi: Pakistan media pic.twitter.com/Dgz8HGCmhp
— ANI (@ANI) June 29, 2020
हे दहशतवादी चारचाकीतून वॉल स्ट्रीट परिसरात दाखल झाल्याचे पोलीस महानिरीक्षक सिंध गुलाम नब्बी मेमन यांनी सांगितले. त्यांना गेटजवळ थांबवण्यात आले. यानंतर त्यांनी सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केला. यावेळी प्रत्युतर देण्यासाठी करण्यात आलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. तर, अन्य दोन गेटच्या आत प्रवेश करण्यात यशस्वी झाले. परंतु इमारतीच्या कंपाऊंडमध्येच त्यांना अडकवून ठेवण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले. या ठिकाणी झालेल्या चकमकीत चौघांचा खात्मा करण्यात आला. एकाही दहशतवाद्याने मुख्य इमारतीत प्रवेश केला नसल्याची माहिती मेमन यांनी दिलीय.
-
#UPDATE Three terrorists killed at Pakistan Stock Exchange in Karachi: Pakistan media https://t.co/fZfPt7pbv4
— ANI (@ANI) June 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#UPDATE Three terrorists killed at Pakistan Stock Exchange in Karachi: Pakistan media https://t.co/fZfPt7pbv4
— ANI (@ANI) June 29, 2020#UPDATE Three terrorists killed at Pakistan Stock Exchange in Karachi: Pakistan media https://t.co/fZfPt7pbv4
— ANI (@ANI) June 29, 2020
डॉन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अतिरेकी मुख्य ट्रेडींग सभागृहात प्रवेश करू शकले नाहीत. स्टॉक एक्सचेंजमधील सर्व व्यवहार अद्याप सुरू ठेवण्यात आले आहेत. अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारामुळे इमारतीतील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. इमारत आणि भोवतालचा परिसर सील करण्यात आला असून आतमधील लोकांना मागील दरवाजातून बाहेर काढण्यात आल्याचे वृत्त आहे.
चार दहशतवाद्यांनी स्टॉक एक्सचेंज इमारतीच्या मुख्य गेटवर ग्रेनेड हल्ला केला. यानंतर आतमध्ये प्रवेश करून कर्मचाऱ्यांवर अंदाधूंद गोळीबार केला. सुरक्षा यंत्रणांना संबंधित घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गुप्तचर यंत्रणा सक्रिय झाली. त्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देत संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याची माहिती मिळत आहे.