काबूल - तालिबान या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तान हा देश पूर्णपणे ताब्यात घेतला आहे. यानंतर तालिबानने देशातील दुतावासातील अधिकारी, परदेशी कामगार आणि धर्मादाय संस्थांना कोणतेही नुकसान होणार नाही, असे आश्वासन दिले आहे.
तालिबानने काय म्हटले?
आम्ही सर्व मुत्सद्दी (diplomat), दूतावास आणि धर्मादाय सेवेतील लोकांना संरक्षण देण्याचे वचन देतो. परदेशी लोकांसाठी तालिबान समस्या होणार नाही. तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, या लोकांना सर्व प्रकारची सुरक्षा प्रदान केले जाईल.
पाश्चिमात्य देशांनी अफगाणिस्तानच्या विविध भागांतील नागरिक आणि मुत्सद्दी कर्मचाऱ्यांना स्थलांतरित करण्यासाठी हलवल्याने तालिबानने हे आश्वासन दिले आहे.
हेही वाचा - अफगाणिस्तानातील परिस्थितीला स्थानिक नेतेच जबाबदार - अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन
दरम्यान, संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी काल (सोमवारी) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या मानवाधिकार उल्लंघनाबद्दल चिंता व्यक्त केली.
हेही वाचा - Afghanistan Crisis : तालिबान्यांचा अफगाणिस्थानच्या संसदेत प्रवेश; भारताने बांधली आहे इमारत