काबूल - तालिबान हा दक्षिणी अफगाणिस्तानच्या कंधार शहरातून 20 कैद्यांची सुटका करणार असल्याचे तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहिन यांनी आज (रविवारी) ट्विटरवरुन सांगितले.
गेल्या आठवड्यात या विषयावर बैठक बोलवण्यात आली होती. मात्र, बंडखोरांनी सरकारशी चर्चा केल्यानंतर हा मोठा विजय ठरल्याचे शाहिन यांनी सांगितले. त्यामुळे, “आज काबुल प्रशासनाच्या 20 कैद्यांना सोडण्यात येईल,” अशी माहिती त्यांनी ट्विटरवरुन दिली.
अफगाणिस्तानमध्ये शांतता करारानुसार घेण्यात आलेल्या निर्णयामध्ये दोन्ही बाजूंकडून कैद्यांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार अफगाण सरकारने बुधवारी १०० तालिबान कैद्यांना सोडले असून आज तालिबान २० कैद्यांना सोडणार आहे. अलीकडे तालिबानच्या हल्ल्यात २५ अफगाण सैनिक ठार झाले होते. दरम्यान, इस्लामिक देशांच्या संघटना, ओआयसी यांच्यासह संयुक्त राष्ट्रांनी तालिबान्यांना शस्त्रे सोडा आणि शांतता प्रस्थापित करा, असं आवाहन केलं होतं