ETV Bharat / international

राष्ट्राध्यक्ष गोताबाया भ्रष्टाचाराच्या सर्व आरोपांतून मुक्त, परदेश प्रवासावरील बंदीही हटवली - राष्ट्राध्यक्ष गोताबाया भ्रष्ट्राचाराच्या सर्व आरोपांतून मुक्त

राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांनी सरकार जनतेसाठी अधिक सक्षमपणे काम करेल, असे आश्वासन दिले. तसेच, भ्रष्टाचार सहन न करण्याचे वचनही दिले. व्यावसायिकता आणि कार्यक्षमता सरकारची ओळख बनेल, असे ते म्हणाले.

गोताबाया राजपक्षे
author img

By

Published : Nov 22, 2019, 6:08 PM IST

कोलंबो - श्रीलंकन न्यायालयाने नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांच्यावरील भ्रष्टाचाराचे सर्व आरोप हटवले आहेत. त्यांच्यावर येथील उच्च न्यायालयात १ लाख ८५ हजार अमेरिकन डॉलर्सच्या भ्रष्टाचाराचा आरोप होता. तसेच, राजपक्षे यांचा पासपोर्टही जप्त करण्यात आला होता. त्यांच्या परदेश प्रवासावर बंदी घालण्यात आली होती. त्यांना पासपोर्ट परत करण्यात आल्याने ही बंदीही हटवली गेली आहे.

राजपक्षे यांच्यावरील बंदी हटविण्यात आल्यानंतर ते पहिल्याच परदेशी दौऱ्यासाठी भारतात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निमंत्रणावरून ते २९ नोव्हेंबरला भारतात येत आहेत.

मागील वर्षी सप्टेंबरमध्ये विशेष उच्च न्यायालयाने श्रीलंकेचे तत्कालीन अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांचे बंधू गोताबाया यांच्या परदेश प्रवासावर बंदी घातली होती. त्यांच्यासह आणखी ६ जणांवर भ्रष्टाचार प्रकरणात ही कारवाई झाली होती. राजपक्षे यांच्यावर डी. ए. राजपक्षे स्मारक आणि संग्रहालयाच्या बांधकामातील सार्वजनिक निधीचा अपहार केल्याच्या आरोप झाला होता.

राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांनी सरकार जनतेसाठी अधिक सक्षमपणे काम करेल, असे आश्वासन दिले. तसेच, भ्रष्टाचार सहन न करण्याचे वचनही दिले. व्यावसायिकता आणि कार्यक्षमता सरकारची ओळख बनेल, असे ते म्हणाले.

देशाचे अ‌ॅटर्नी जनरल यांच्याऐवजी डेप्युटी सॉलिसिटर जनरल दिलीपा पेईरीस यांनी न्यायालयाकडे राजपक्षे यांच्यावरील आरेप आणि निर्बंध हटवण्याची मागणी केली. श्रीलंकन संविधानातील तरतुदींनुसार राष्ट्राध्यक्षांविरोधात नागरी किंवा गुन्हेगारी खटले चालवता येत नाहीत. यामुळे राजपक्षे यांना सर्व आरोपांतून मुक्त करावे, अशी मागणी करण्यात डेप्युटी सॉलिसिटर जनरल यांनी केली. त्यानुसार, न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष गोताबाया यांची भ्रष्ट्राचाराच्या सर्व आरोपांतून मुक्तता करत त्यांच्या परदेश प्रवासावरील बंदीही हटवली आहे.

गोताबाया राजपक्षे ७० वर्षांचे असून त्यांनी राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत झंझावाती विजय मिळवला. त्यांनी त्यांच्या पाठोपाठचे प्रतिस्पर्धी सजीत प्रेमदासा यांचा १३ लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. श्रीलंकेत ४१. ९९ टक्के मतदान झाले. या मतांपैकी ५२.२५ टक्के मतांच्या फरकाने राजपक्षे यांनी प्रेमदासा यांच्यावर विजय मिळवला.

राजपक्षे हे माजी संरक्षण सचिव होते. त्यांनी देशात लिट्टे (LTTE - लिबरेशन टायगर्स ऑफ तमीळ ऐलम) या दहशतवादी संघटनेविरोधात बराच काळ सुरू असलेले नागरी युद्ध संपवण्यात मोठी कामगिरी बजावल्याचे सांगितले जाते.

Intro:Body:

राष्ट्राध्यक्ष गोताबाया भ्रष्ट्राचाराच्या सर्व आरोपांतून मुक्त, परदेश प्रवासावरील बंदीही हटवली

कोलंबो - श्रीलंकन न्यायालयाने नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांच्यावरील भ्रष्टाचाराचे सर्व आरोप हटवले आहेत. त्यांच्यावर येथील उच्च न्यायालयात १ लाख ८५ हजार अमेरिकन डॉलर्सच्या भ्रष्टाचाराचा आरोप होता. तसेच, राजपक्षे यांचा पासपोर्टही जप्त करण्यात आला होता. त्यांच्या परदेश प्रवासावर बंदी घालण्यात आली होती. त्यांना पासपोर्ट परत करण्यात आल्याने ही बंदीही हटवली गेली आहे.

राजपक्षे यांच्यावरील बंदी हटविण्यात आल्यानंतर ते पहिल्याच परदेशी दौऱ्यासाठी भारतात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निमंत्रणावरून ते २९ नोव्हेंबरला भारतात येत आहेत.

मागील वर्षी सप्टेंबरमध्ये विशेष उच्च न्यायालयाने श्रीलंकेचे तत्कालीन अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांचे बंधू गोताबाया यांच्या परदेश प्रवासावर बंदी घातली होती. त्यांच्यासह आणखी ६ जणांवर भ्रष्टाचार प्रकरणात ही कारवाई झाली होती. राजपक्षे यांच्यावर डी. ए. राजपक्षे स्मारक आणि संग्रहालयाच्या बांधकामातील सार्वजनिक निधीचा अपहार केल्याच्या आरोप झाला होता.

राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांनी सरकार जनतेसाठी अधिक सक्षमपणे काम करेल, असे आश्वासन दिले. तसेच, भ्रष्टाचार सहन न करण्याचे वचनही दिले. व्यायसायिकता आणि कार्यक्षमता सरकारची ओळख बनेल, असे ते म्हणाले.

देशाचे अॅटर्नी जनरल यांच्याऐवजी डेप्युटी सॉलिसिटर जनरल दिलीपा पेईरीस यांनी न्यायालयाकडे राजपक्षे यांच्यावरील आरेप आणि निर्बंध हटवण्याची मागणी केली. श्रीलंकन संविधानातील तरतुदींनुसार राष्ट्राध्यक्षांविरोधात नागरी किंवा गुन्हेगारी खटले चालवता येत नाहीत. यामुळे राजपक्षे यांना सर्व आरोपांतून मुक्त करावे, अशी मागणी करण्यात डेप्युटी सॉलिसिटर जनरल यांनी केली. त्यानुसार, न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष गोताबाया यांची भ्रष्ट्राचाराच्या सर्व आरोपांतून मुक्तता करत त्यांच्या परदेश प्रवासावरील बंदीही हटवली आहे.

गोताबाया राजपक्षे ७० वर्षांचे असून त्यांनी राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत झंझावाती विजय मिळवला. त्यांनी त्यांच्या पाठोपाठचे प्रतिस्पर्धी सजीत प्रेमदासा यांचा १३ लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. श्रीलंकेत ४१. ९९ टक्के मतदान झाले. या मतांपैकी ५२.२५ टक्के मतांच्या फरकाने राजपक्षे यांनी प्रेमदासा यांच्यावर विजय मिळवला.

राजपक्षे हे माजी संरक्षण सचिव होते. त्यांनी देशात लिट्टे (LTTE - लिबरेशन टायगर्स ऑफ तमीळ ऐलम) या दहशतवादी संघटनेविरोधात बराच काळ सुरू असलेले नागरी युद्ध संपवण्यात मोठी कामगिरी बजावल्याचे सांगितले जाते.

Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.