ETV Bharat / international

श्रीलंका बॉम्बस्फोटांमध्ये करोडपती व्यापाऱ्याची मुले सहभागी - two bombers

ब्रिटिश सुरक्षा सूत्रांनी आणखी एका बॉम्ब हल्लेखोराची ओळख पटविली आहे. अब्दुल लतीफ जमील मोहम्मद असे याचे नाव आहे. ते इंग्लंडमध्ये २००६ ते २००७ दरम्यान शिक्षणासाठी गेला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया येथून पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर तो श्रीलंकेला परत आला होता.

बॉम्बस्फोटांतील मृतांना आदरांजली
author img

By

Published : Apr 25, 2019, 3:48 PM IST

कोलंबो - श्रीलंकेत ईस्टर संडेदिवशी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये मोठा खुलासा समोर आला आहे. श्रीलंकेतील एका महत्त्वाच्या आणि श्रीमंत कुटुंबातील व्यक्ती यामध्ये सहभागी असल्याचे समोर आले आहे. ९ बॉम्बस्फोटांपैकी मसाल्याचा व्यापारी मोहम्मद इब्राहिम याच्या २ मुलांनी यातील २ स्फोट घडवून आणल्याचे समोर आले आहे. इम्साथ इब्राहिम आणि इल्हाम इब्राहिम अशी या मुलांची नावे आहेत.

या स्फोटांमध्ये ३५० अधिक जण ठार तर, ५६० हून अधिक जखमी झाले आहेत. यात यूनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड (यूएनसीएफ) ने दिलेल्या आकडेवारीनुसार ४५ लहान मुलांना प्राणांना मुकावे लागले. तर, ३९ विदेशी नागरिकांचाही समावेश होता.

दरम्यान, ब्रिटिश सुरक्षा सूत्रांनी आणखी एका बॉम्ब हल्लेखोराची ओळख पटविली आहे. अब्दुल लतीफ जमील मोहम्मद असे याचे नाव आहे. ते इंग्लंडमध्ये २००६ ते २००७ दरम्यान शिक्षणासाठी गेला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया येथून पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर तो श्रीलंकेला परत आला होता.

याशिवाय, श्रीलंकन अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, शिराल लक्तिकाला हाही या हल्ल्यात दोषी सापडला आहे. तो पंतप्रधानांचा सल्लागार होता. त्याने शांग्री-ला हॉटेलमध्ये आत्मघातकी स्फोट घडवून आणला. त्याने इन्शान सीलावान असे नाव धारण केले होते. तो हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचे सांगितले जात आहे.

Intro:Body:

National NEWS

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.