ETV Bharat / international

पाकिस्तानमध्ये भरधाव बस पलटून अपघात; १५ ठार

सिंध प्रांतामध्ये असलेल्या उथाल या गावात हा अपघात झाला. वेगात जात असल्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटून हा अपघात झाल्याची माहिती शरीफ अहमद या पोलीस अधिकाऱ्याने दिली. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Speeding passenger bus overturns in Pakistan, killing 15
पाकिस्तानमध्ये भरधाव बस पलटून अपघात; १५ ठार
author img

By

Published : Feb 2, 2021, 8:31 PM IST

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या मुलतानमध्ये भरधाव बस पलटून भीषण अपघात झाला आहे. यामध्ये सुमारे १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, नऊ जण जखमी असल्याचेही पोलिसांनी सांगितले. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश असल्याचेही समजत आहे.

चालकाचा ताबा सुटल्याने अपघात..

सिंध प्रांतामध्ये असलेल्या उथाल या गावात हा अपघात झाला. वेगात जात असल्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटून हा अपघात झाल्याची माहिती शरीफ अहमद या पोलीस अधिकाऱ्याने दिली. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बसचा चक्काचूर..

यामधील जखमींनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस बलुचिस्तान प्रांतातून कराचीकडे जात होती. अपघात एवढा भीषण होता, की बसचा चक्काचूर झाला. आजूबाजूच्या गावातील रहिवाशांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

खराब रस्ते आणि वाहतुकीच्या नियमांबाबत असलेली अनास्था यामुळे अशा प्रकारचे अपघात पाकिस्तानमध्ये नित्याची बाब झाली आहे.

हेही वाचा : धनबादच्या मछळी पट्टीमध्ये बॉम्बस्फोट; तीन मुले जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.