सेऊल - दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे बुधवारी बांधकाम साईटवर भीषण आग लागली. या दुर्घटनेत तब्बल 38 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीजवळ ही आग लागली होती. मृताचा आकडा वाढण्याची शक्यत वर्तवली जात आहे.
आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्यासाठी आणि इमारतीमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. यावेळी 8 बचावकर्मी गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर इतर 2 जण किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान अधिकारी आग कशामुळे लागली याचा तपास करत आहेत.
माहितीनुसार आतापर्यंत 30 कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे. यापूर्वी 2008 मध्ये इचोन येथे बांधकाम साईटवर लागलेल्या आगीत 40 जणांचा मृत्यू झाला होता.