लाहोर - पाकिस्तानमध्ये एका शिख तरुणीचे अपहरण करून तिला जबरदस्तीने मुस्लिम धर्म स्विकारायला लावल्याची खळबजनक घटना घडली आहे. तरुणीचे अपहरण करून तिला बंदुकीचा धाक दाखवत तिचे एका मुस्लिम मुलाशी लग्न लावून दिल्याची माहिती आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी भारतीय परराष्ट्रमंत्र्यांना हा मुद्दा पाकिस्तानकडे मांडण्याची विनंती केली आहे.
-
Shocking incident of a Sikh girl being kidnapped & forced to convert to Islam in Nankana Sahib, Pakistan. Call upon @ImranKhanPTI to take firm and immediate action against the perpetrators. Request @DrSJaishankar to strongly take up the issue with his counterpart at the earliest. pic.twitter.com/hpHvD9kkEJ
— Capt.Amarinder Singh (@capt_amarinder) August 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Shocking incident of a Sikh girl being kidnapped & forced to convert to Islam in Nankana Sahib, Pakistan. Call upon @ImranKhanPTI to take firm and immediate action against the perpetrators. Request @DrSJaishankar to strongly take up the issue with his counterpart at the earliest. pic.twitter.com/hpHvD9kkEJ
— Capt.Amarinder Singh (@capt_amarinder) August 30, 2019Shocking incident of a Sikh girl being kidnapped & forced to convert to Islam in Nankana Sahib, Pakistan. Call upon @ImranKhanPTI to take firm and immediate action against the perpetrators. Request @DrSJaishankar to strongly take up the issue with his counterpart at the earliest. pic.twitter.com/hpHvD9kkEJ
— Capt.Amarinder Singh (@capt_amarinder) August 30, 2019
हे ही वाचा - झिरो पॉईंटवर पार पडणार भारत-पाक दरम्यान कर्तारपूर कॉरिडॉर बैठक
संबधीत तरुणीचे नाव जगजीत कौर असून ती गुरद्वारा तंबू साहिबचे पुजारी भगवान सिंह यांची मुलगी आहे. जर मुलीची सुटका नाही केली. तर पंजाबच्या राज्यपालाच्या घरासमोर स्व:ताला पेटवून घेऊ, असा इशारा तरुणीच्या परिवाराने एका व्हिडिओमध्ये पाकिस्तानी सरकारला दिला आहे.
हे ही वाचा - इम्रान खान यांचा नया पाकिस्तान लष्कराच्या वर्चस्वाखाली - अमेरिका काँग्रेस अहवाल
काही गुंड जबदस्तीने आमच्या घरात घुसले. त्यांनी माझ्या छोट्या बहिनीचे अपहरण करून तीच्याकडून जबरदस्तीने मुस्लिम धर्म कबूल करून घेतला. यासंदर्भात आम्ही तक्रार दाखल केली आहे. मात्र गुंडानी तक्रार परत घेण्यास सांगितले आहे. जर तक्रार परत नाही घेतली. तर ते आमचे जबरदस्तीने धर्मांतर करतील अशी धमकी दिल्याचे तरुणीचा भाऊ सुरिंदरने सांगितले.
हे ही वाचा - पाकिस्तानकडून क्षेपणास्त्राची चाचणी; काश्मीर मुद्द्यावर शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न
पिडीत परिवाराने इम्रान खान आणि पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीश असीफ सईद खोसा यांना जगजीतच्या सुटकेची मागणी केली आहे. दरम्यान पाकिस्तामधील शीख समुदायाने या घटनेचा निषेध केला आहे.