ETV Bharat / international

शरीफ हे लंडनमध्ये बसून सैन्यावर टीका करीत आहेत - इम्रान खान - पाकिस्तान लोकशाही चळवळ

शरीफ यांनी पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेन्टच्या (पीडीएम) बॅनरखाली विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या रॅलीदरम्यान खान यांच्यावर टीका केली होती. त्यावर इम्रान खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

sharif-is-sitting-in-london-like-a-fox-criticizing-the-army-said-imran-khan
शरीफ हे कोल्ह्यासारखे लंडनमध्ये बसून सैन्यावर टीका करत आहेत- इम्रान खान
author img

By

Published : Nov 7, 2020, 5:43 PM IST

इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शनिवारी माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर जोरदार टीका केली. शरीफ हे लंडनमध्ये बसून सैन्यावर टीका करत आहेत. सैन्यात बंडखोरी करण्याचा प्रयत्न करणारे 'विद्रोही' असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शरीफ हे पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजचे (पीएमएल-एन) सर्वोच्च नेते असून त्यांना 2017मध्ये सर्वोच्च न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या आरोपावरून शिक्षा सुनावली आहे. 2018च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जावेद बाजवा आणि आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांनी इम्रान खान यांना मदत केली असल्याचा आरोप शरीफ यांनी केला होता. शरीफ यांनी १ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेन्टच्या (पीडीएम) बॅनरखाली विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या रॅलीदरम्यान खान यांच्या नेतृत्वात पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) सरकारला काढून टाकण्यासंबंधी संयुक्तपणे मेळाव्यात ही प्रतिक्रिया दिली होती.

पाकिस्तानामध्ये सैन्यात बंडखोरी करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. लष्कर व आयएसआय प्रमुखांना बदनाम करत असल्याचे पंतप्रधान खान यांनी म्हटले. सध्या जामिनावर सुटलेल्या पीएमएल-एनच्या प्रमुखांवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने त्याला गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये वैद्यकीय उपचारासाठी लंडनला जाण्याची परवानगी दिली होती; परंतु ते परत आलेच नाहीत, असेही खान यांनी म्हटले.

सोबतच सैन्याने राजकारणात हस्तक्षेप केल्याचा उघडपणे आरोप केल्याबद्दल खान यांनी शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांनाही उत्तर दिले आहे. नवाज शरीफ आणि त्यांच्या मुलांना देशात पाकिस्तानी सैन्यावर हल्ला करण्याची हिम्मत करू शकत नाहीत आणि म्हणूनच ते परदेशात पळून गेले आहेत. मरियम नवाज यांना ठाऊक आहे की, ती एक महिला असल्याने आम्ही तिला कारागृहात पाठवणार नाही, म्हणून त्यांनी लष्कराविरुद्ध टीका करण्यास सुरवात केली आहे, असे इम्रान खान यांनी म्हटले.

हेही वाचा -बिहार निवडणूक : सीमांचलची 'आवाम' ठरवणार बिहारचा 'निजाम'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.