कराची (पाकिस्तान) - पाकिस्तानची राजधानी कराची स्फोटाने आज हादरली आहे. कराचीमधील गुलशन-ए-इक्बालमधील या ठिकाणी झालेल्या स्फोटात किमान ५ जणांचा मृत्यू झाला. तर २० जण जखमी झाले आहेत.
स्फोटामधील जखमी आणि मृतांना जवळील पटेल रुग्णालयात हलविण्यात आल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. स्थानिक माध्यमाच्या वृत्तानुसार स्फोट हा कराची विद्यापीठाच्या विरुद्ध दिशेला असणाऱ्या चार मजली इमारतीत झाला आहे. स्फोटाचे कारण अद्याप समोर आले नाही. त्याबाबत पोलीस तपास करत आहेत.
काही माध्यमाच्या माहितीनुसार सिलिंडरचा स्फोट झाला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. स्फोट एवढा ताकदीचा होता, की इमारतीच्या परिसरातील वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी स्फोटाच्या चौकशीचे करण्याचे आदेश कराची आयुक्तांना दिले आहेत.
दरम्यान, मंगळवारी कराचीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात पाच जण जखमी झाले आहेत. हा आयईडीच्या स्फोटकांनी स्फोट झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.