थिंफू - पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या भूतान दौऱ्यावर गेले आहेत. आज (शनिवारी) भूतानचे पंतप्रधान लोते तेशरिंग यांनी मोदींचे पारो आंतराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केले. यावेळी मोदींना 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला. या भेटीमध्ये दोन्ही देशांमध्ये १० सामंजस्य करार होणार आहेत.
-
#WATCH Prime Minister Narendra Modi receives a Guard of Honour in Paro, Bhutan. pic.twitter.com/ze85XCpFre
— ANI (@ANI) August 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH Prime Minister Narendra Modi receives a Guard of Honour in Paro, Bhutan. pic.twitter.com/ze85XCpFre
— ANI (@ANI) August 17, 2019#WATCH Prime Minister Narendra Modi receives a Guard of Honour in Paro, Bhutan. pic.twitter.com/ze85XCpFre
— ANI (@ANI) August 17, 2019
दोन्ही देशांमध्ये १० एमओयू (सामंजस्य करार) होणार आहेत. यामध्ये शिक्षण क्षेत्रातील करारांचाही समावेश आहे. तसेच ५ प्रकल्पांचे उद्धाटनही मोदींच्या हस्ते होणार आहे. मनगडेच्चु जलविद्युत केंद्रासह, इस्रोने उभारलेल्या अर्थ स्टेशनचे उद्धाटनही मोदी करणार आहेत.
शेजारील राष्ट्रांना प्राधान्य या भारताच्या नितीनुसार भूतानसोबत भारताचे मैत्रीसंबध महत्त्वाचे आहेत. या दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये दोघांमधील संबध आणखी घट्ट होतील, असे भारताने निवेदनामध्ये म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी सर्वप्रथम 'सीमतोखा डझोंग' या मोनास्ट्रीला (मठ) भेट देणार आहेत. ही मोनास्ट्री भूतान देशाला एकजूट करणाऱ्या नेगवांग नामग्याल यांनी बांधली आहे. दुसऱ्या दिवशी मोदी 'चोरतेन' स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत. तसेच तशिचोडडोजांग या बौद्ध मठामध्ये आयोजित सांस्कृतीक कार्यक्रमालाही ते उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान मोदींची ही दुसरी भूतान भेट आहे. याआधी भाजप सरकारच्या पहिल्या कार्यकाळामध्ये त्यांनी भूतानला भेट दिली होती.