नवी दिल्ली - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील जामीन याचिकेवर सुनावणीपूर्वी नवाज यांची प्रकृती खालवली. त्यामुळे त्यांच्यावर लाहोर सर्व्हिस रुग्णालयात उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान, त्यांना हृदयविकाराचा झटका आला. दरम्यान, मागील काही दिवसांपासून नवाजती प्रकृती खालावली असून त्यांच्या प्लेटलेट्स संख्या कमी झाल्याचे समजते.
-
Pakistani media: Former Prime Minister Nawaz Sharif suffers minor heart attack, at Services hospital in Lahore. (file pic) pic.twitter.com/xECm9u6E4T
— ANI (@ANI) October 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Pakistani media: Former Prime Minister Nawaz Sharif suffers minor heart attack, at Services hospital in Lahore. (file pic) pic.twitter.com/xECm9u6E4T
— ANI (@ANI) October 26, 2019Pakistani media: Former Prime Minister Nawaz Sharif suffers minor heart attack, at Services hospital in Lahore. (file pic) pic.twitter.com/xECm9u6E4T
— ANI (@ANI) October 26, 2019
डॉक्टरांनी आवश्यक ते उपचार केले असून सध्यस्थितीत नवाज यांची स्थिती स्थिर असल्याचे समजते. नवाज यांची प्रकृती बिघडल्याने, नवाज यांचे बंधू शहबाज शरीफ यांनी पंतप्रधान इमरान खान यांच्यावर निशाना साधला आहे. नवाज यांची काळजी व्यवस्थित घेतली जात नाही. जर नवाज यांना काही झाल्यास त्याला जबाबदार इमारान असतील, असे शहबाज शरीफ यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, नवाज यांच्या पाठोपाठ त्यांची मुलगी मरियम यांचीही प्रकृती बिघडली असून त्यांनाही रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. लाहोर उच्च न्यायालयाने नवाज यांची प्रकृतीमुळे जामीन दिला आहे.
हेही वाचा - पवित्र गुरु नानक देव गुरुद्वारा भारतीयांसाठी खुला; कर्तारपूर कॉरिडॉर करारावर भारत-पाकच्या सह्या
हेही वाचा - तरुणीला जिवंत जाळणाऱ्या १६ दोषींना दोन महिन्यांच्या आत मृत्युदंडाची शिक्षा