ETV Bharat / international

इमरान खान यांनी लादेनला संबोधले 'शहीद' - इमरान खान ऑन लादेन

आम्ही दहशतवादाविरूद्ध लढा देण्यासाठी अमेरिकन लोकांना साथ दिली. मात्र, अडचण ही आहे की, पाकिस्तान हे दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आहे, त्यांच्या या आरोपाला आम्हांला तोंड द्यावे लागत आहे. हे भयानक आहे. आमचा सहयोगी गुपचुप आमच्या देशात येऊन दहशतवाद्याला ठार मारतो आणि याची आम्हांला कल्पना नाही, असेही ते म्हणाले.

imran khan
इमरान खान
author img

By

Published : Jun 26, 2020, 6:23 AM IST

इस्लामाबाद (पाकिस्तान) - पाकिस्तानचे प्रधानमंत्री इमरान खान यांनी गुरुवारी दहशतवादी ओसामा बिन लादेन याला 'शहीद' असे संबोधले आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. खान यांच्या वक्तव्या संदर्भातील क्लिप पत्रकार नाईला इनायत यांनी ट्विटरवर पोस्ट केली. ते देशात संसदेत बोलत असल्यासारखे त्या क्लिपमध्ये दिसत आहे.

इमरान खान यांच्या वक्तव्या सदंर्भात व्हायरल झालेली क्लिप.

यासंदर्भात एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. अमेरिकेवर टीका करत ते लादेनबद्दल म्हणाले, 'शहीद कर दिया'. त्यात त्यांनी अबोटाबाद येथे लादेनला कशा प्रकारे मारण्यात आले, याबाबतही सांगितले. आम्ही दहशतवादाविरूद्ध लढा देण्यासाठी अमेरिकन लोकांना साथ दिली. मात्र, अडचण ही आहे की, पाकिस्तान हे दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आहे, त्यांच्या या आरोपाला आम्हाला तोंड द्यावे लागत आहे. हे भयानक आहे. आमचा सहयोगी गुपचुप आमच्या देशात येऊन दहशतवाद्याला ठार मारतो आणि याची आम्हाला कल्पना नाही, असेही ते म्हणाले.

खान यांच्या वक्तव्या संदर्भातील क्लिप पत्रकार नाईला इनायत यांनी ट्विटरवर पोस्ट केली. यामध्ये ते संसदेत बोलत असल्यासारखे दिसत आहे.

ओसामा बिन लादेन हा अल कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख होता. अमेरिकेत 2001 मध्ये झालेल्या 9/11च्या आतंकवादी हल्ल्याच्या मागेही त्याचाच हात होता. लादेनला अमेरिकेच्या नेवी सिल्सने एका ऑपरेशनच्या अतंर्गत ठार केले होते.

२०११ मध्ये अमेरिकेच्या नेव्ही सील्सने लष्करी कारवाईत अ‍ॅबोटाबाद येथे लादेनला मारले गेले होते. त्याच्यावर जगभरातील अनेक दहशतवादी हल्ल्याचे आरोप होते. विशेषत: अमेरिकेतील 2001 मधील 9/11 हल्ल्यात जेव्हा जवळपास 3000 लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यावेळी अमेरिकन शहरांना टारगेट करण्यासाठी 5 विमानांचे अपहरण करण्यात आले होते.

दरम्यान, इमरान खान यांनी लादेनबद्दल ही सहानूभूती पहिल्यांदाच दाखविलेली नाही. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येही खान यांनी आपल्या अमेरिकन दौर्‍यादरम्यान एबोटाबादमध्ये ओसामा बिन लादेनच्या उपस्थितीबद्दल आम्ही अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांना माहिती दिली होती, असे वक्तव्य केले होते. पाकिस्तानला पूर्णपणे अंधारात ठेवून लादेनला ठार करण्यासाठी अमेरिकेने "गुप्त" कारवाई करायला नको होती, ते असेही म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.