इस्लामाबाद - पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुझफ्फरगढ जिल्ह्यात मन सुन्न करणारी घटना घडली आहे. मुलीने प्रेमविवाह केल्याने नाराज झालेल्या वडिलांनी धक्कादायक पाऊल उचलत मुलीच्या घरातील सात जणांना जिवंत जाळले आहे. आरोपी मंझूर हुसैन यांनी आपल्या दोन मुली आणि चार नातवंडे आणि एक जावयाला जिवंत जाळले.
मुझफ्फरगढमध्ये मंझूर हुसैन यांच्या फोजिया बीबी आणि खुर्शीद माई या दोन मुली आपल्या कुटुंबासोबत राहत होत्या. मंझूर हुसैन यांनी आपल्या मुलींच्या घराला आग लावली. या आगीत फोजिया बीबी, खुर्शीद माई, दोघींची चार मुले आणि खुर्शीद माई यांचे पतीचा मृत्यू झाला. कामानिमित्त बाहेर गेल्याने बीबी यांचे पती मेहबूब अहमद बचावले आहेत. मेहबूब यांनी मंझूर हुसैन आणि त्यांचा मुलगा साबीर हुसैनविरोधात तक्रार दाखल केली आहे.
पोलीस अधिकारी अब्दुल मजीद यांनी वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितले आहे की, हे प्रकरण प्रेमविवाहावरून दोन कुटुंबांत निर्माण झालेल्या शत्रुत्वाचा परिणाम आहे. मेहबूब अहमदने पोलिसांना सांगितले, की त्याने आणि त्याच्या पत्नीने 2020 मध्ये प्रेम विवाह केला होता. यामुळे मंजूर हुसेन अत्यंत संतापले होते. त्याचा या नात्याला विरोध होता.
पाकिस्तानमध्ये दरवर्षी ऑनर किलिंगची सुमारे 1000 प्रकरणे -
ह्यूमन राइट्स वॉचने दिलेल्या अहवालात म्हटले आहे, की पाकिस्तानमध्ये दरवर्षी ऑनर किलिंगची सुमारे 1000 प्रकरणे नोंदवली जातात. तसेच पोलिसांच्या मते, करो- करी हत्यांना ऑनर किलिंग म्हणूनही ओळखले जाते. अशा हत्यांचा तपास करणे कठीण आहे. कारण, पीडित आणि आरोपी दोघेही सहसा एकाच कुटुंबातील किंवा जमातीचे असतात.
हेही वाचा - ऑनर किलिंग- प्रेमविवाह केल्याने वडिलांनी मुलीच्या सासरच्या ७ कुटुंबीयांची केली हत्या