इस्लामाबाद - पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी 'काही शक्तींचा पाकिस्तानला अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे,' असे वक्तव्य बुधवारी केले.
पेशावर येथे झालेल्या स्फोटांवर प्रतिक्रिया देताना मंत्री कुरेशी यांनी संघीय आणि प्रांतीय सरकारांनी अशा घटना रोखण्यासाठी जागरूक असणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. या हल्ल्यात आठ जण मारले गेले होते.
त्यांनी सांगितले की, देशाच्या सुरक्षिततेसाठी लोकांचा पाठिंबा आवश्यक आहे. यासह कुरेशी यांनी धार्मिक सद्भावन दृढ करण्याचे आवाहनही केले.
'काही घटक ईशनिंदा प्रकरणात राजकारण करण्याच्या प्रयत्नात आहेत. सरकार आपल्या जबाबदारीविषयी बेपर्वा नाही,' असे त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
हेही वाचा - खशोग्गी यांच्या प्रेयसीने सौदी क्राउन प्रिन्सविरोधात केली फिर्याद दाखल
'सरकार ईद मिलाद-उल-नबी उत्सावादरम्यान सुरक्षेची काळजी घेईल,' असे परराष्ट्र मंत्री कुरेशी म्हणाले.
जीओ पाकिस्तानशी बोलताना कुरेशी यांनी त्यांचे अफगाण समकक्ष मोहम्मद हनीफ अतमर यांच्याशी क्वेटा आणि पेशावरमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांविषयीच्या चर्चेचाही विषय काढला.
'आपण अतमर यांना अफगाणिस्तानच्या जमिनीवरील दहशतवादी घटकांची वाढ होत असल्याविषयी सावधा केले,' तसेच, काही घटक पाक-अफगाण संबंधात बाधा आणत असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
हेही वाचा - कोरोना : ब्राझीलमध्ये एका दिवसात मृत्यू होणाऱ्यांची संख्या दुप्पट