ETV Bharat / international

एसओपीचे उल्लंघन केल्याबद्दल पाकने तुर्की एअरलाइन्सला दंड ठोठावला

कोविड - 19 साथीच्या रोगासंदर्भात लागू असलेल्या मानकांचे (एसओपी) चे उल्लंघन केल्याबद्दल पाकिस्तान सरकारने तुर्की एअरलाइन्सवर एक लाख पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावला आहे. डॉन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय विमान कंपनीकडून एसओपीच्या उल्लंघनाची ही दुसरी घटना आहे. 16 ऑक्टोबर रोजी कतार एअरवेजला एसओपीच्या उल्लंघनाबद्दल एक लाख पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.

तुर्की एअरलाइन्सला दंड न्यूज
तुर्की एअरलाइन्सला दंड न्यूज
author img

By

Published : Oct 23, 2020, 10:19 PM IST

इस्लामाबाद - कोविड - 19 साथीच्या रोगासंदर्भात लागू असलेल्या मानकांचे (एसओपी) उल्लंघन केल्याबद्दल पाकिस्तान सरकारने तुर्की एअरलाइन्सवर एक लाख पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

डॉन न्यूजच्या वृत्तानुसार, सिव्हील एव्हिएशन अ‌ॅथॉरिटी ऑफ पाकिस्तानने (सीएए) गुरुवारी तुर्की एअरलाइन्सला आठवड्याभरात अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

पाकिस्तानने सर्व एअरलाइन्स ऑपरेटर्सना सल्ला दिला आहे की, त्यांनी सरकारच्या निर्देशांचे काटेकोर पालन केले पाहिजे. यामध्ये वर्ग-बी देशातील प्रवाशांना निगेटिव्ह आरटी-पीसीआर चाचणी अहवाल सादर करणे आवश्यक आहे. हा अहवाल प्रवास सुरू होण्याच्या आधीच्या 96 तासांच्या आतील असावा. असे न झाल्यास एअरलाईन्स बोर्डिंग पास देणार नाही, असे म्हटले आहे.

हेही वाचा - पाकिस्तान एफएटीएफच्या 'ग्रे लिस्ट'मधून बाहेर पडण्याची शक्यता नाहीच : अहवाल

तुर्की एअरलाइन्सने 15 ऑक्टोबरला माली ते इस्तंबूल आणि नंतर लाहोरला जाणाऱ्या प्रवाशाला निगेटिव्ह आरटी-पीसीआर चाचणी केलेली नसतानाही हवाई प्रवास करू दिला आणि पाकिस्तानला आणले. याआधी 13 ऑक्टोबरला पाकिस्तानकडून मानक नियमावली जारी करण्यात आली होती. ती बंधनकारक असतानाही तुर्की एअरलाईन्सने त्याचा भंग केला. यानंतर पाकने तुर्की एअरलाईन्सला हा दंड ठोठावला.

निवेदनात म्हटले आहे की, हा पाकिस्तानी प्रवासी सीएएला कोणतीही माहिती न देता 15 ऑक्टोबरपासून इस्तंबूल विमानतळावर अडकला होता.

डॉन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय विमान कंपनीकडून एसओपीच्या उल्लंघनाची ही दुसरी घटना आहे.

16 ऑक्टोबर रोजी कतार एअरवेजला एसओपीच्या उल्लंघनाबद्दल एक लाख पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.

हेही वाचा - अफगाणिस्तान : प्राणघातक हवाई हल्ल्यात 12 मुलांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.