ETV Bharat / international

पाकिस्तानकडून कोरोना लस 'पाकवॅक' विकसित; चीनकडून घेतली मदत

पाकिस्तानचे विशेष आरोग्य सहायक डॉ. फैसल सुल्तान म्हणाले, की पाकिस्तान कठीण आव्हानांवर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. या संकटकाळात मित्रांच्या मदतीने संधीत रुपांतरण करण्यात येत आहे. कोरोनाच्या आव्हानात्मक संकटात चीन हा आम्हाला सर्वात जवळचा मित्र असल्याचे आढळले.

कोरोना लस
कोरोना लस
author img

By

Published : Jun 2, 2021, 6:54 PM IST

इस्लामाबाद - पाकिस्तानने चीनच्या मदतीने स्वदेशी लस विकसित केली आहे. पाकने पाकवॅक असे या लशीला नाव दिले आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी पाकिस्तानकडून लसीकरणाचे प्रयत्न केले जात आहेत.

पाकिस्तानचे विशेष आरोग्य सहायक डॉ. फैसल सुल्तान म्हणाले, की पाकिस्तान कठीण आव्हानांवर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. या संकटकाळात मित्रांच्या मदतीने संधीत रुपांतरण करण्यात येत आहे. कोरोनाच्या आव्हानात्मक संकटात चीन हा आम्हाला सर्वात जवळचा मित्र असल्याचे आढळले. ते पाकवॅक लशीच्या लाँचिंगवेळी बोलत होते.

हेही वाचा-आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक आजपासून सुरू; जाणून घ्या, तज्ज्ञांचा अंदाज

कच्च्या मालाचा चीनकडून पुरवठा

लसनिर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा चीनने पुरवठा केला आहे. त्यामुळे लस निर्मिती करणे शक्य झाले आहे. येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात लशींचे उत्पादन घेण्यात येणार असल्याचे नॅशनल कमांड अँड ऑपरेशन्स सेंटरचे (एनओसी) प्रमुख असद उमार यांनी सांगितले. हा देशासाठी महत्त्वाचा दिवस असणार आहे.

हेही वाचा-एलपीजी गॅस सिलिंडर १२२ रुपयांनी स्वस्त; हॉटेलसह रेस्टॉरंट उद्योगांना होणार फायदा

संसर्गाचे प्रमाण तीन महिन्यांत पहिल्यांदाच ४ टक्क्यांहून कमी

पाकिस्तानमध्ये कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण तीन महिन्यांत पहिल्यांदाच ४ टक्क्यांहून कमी आहे. पाकिस्तानमध्ये एकूण ९,२२,८२४ कोरोनाबाधित आहेत. पाकिस्तानमध्ये ५३ लाख लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे. त्यापैकी २० लाख लोकांना कोरोना लशींचे पूर्ण डोस मिळाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.