ETV Bharat / international

जेसिंडा आर्डन यांच्या मुलीने केले 'असे' काही, की त्यांना माफी मागत फेसबूक लाईव्ह बंद करावं लागलं - न्यूझीलंड पंतप्रधान

लहान मुलांची प्रत्येक इच्छा आपण पूर्ण करतोच. एका देशाच्या पंतप्रधानही यातून सुटलेल्या नाहीत. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांचेही आपली मुलगी नीवच्या हट्टापुढे काही चालले नाही.

New Zealand PM
जेसिंडा आर्डन
author img

By

Published : Nov 11, 2021, 10:04 AM IST

वेलिंग्टन - बालहट्टासमोर कोणाचेही काही चालत नाही. लहान मुलांच्या हट्टापुढे प्रत्येक जण गुडघे टेकतोच. लहान मुलांची प्रत्येक इच्छा आपण पूर्ण करतोच. एका देशाच्या पंतप्रधानही यातून सुटलेल्या नाहीत. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांचेही आपली मुलगी नीवच्या हट्टापुढे काही चालले नाही. कोरोना विषयावरून देशाला फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जेसिंडा देशाला संबोधित करत होत्या. यावेळी त्यांची मुलगी नीवने त्यांना आवाज दिला आणि झोपण्यासाठी येण्यास सांगितले. अखेर तिच्या हट्टापुढे जेसिंडा यांना फेसबूक लाईव्ह बंद करावे लागले. कणखर, कनवाळू, निश्चयी, धीरोदात्त, संयमी, प्रामाणिक अशी ओळख मिळवलेल्या जेसिंडा आर्डन पुन्हा एकदा आपल्या मातृत्व प्रेमामुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांचा हा फेसबूक लाईव्हाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

रविवारी-सोमवारी रात्री 8-9 नोव्हेंबर 2021 च्या रात्री जेसिंडा फेसबूकच्या माध्यमातून आपल्या घरातूनच देशातील जनतेला संबोधित करत होत्या. कोरोनामुळे निर्माण झालेल्या वाईट परिस्थितीवर त्या बोलत होत्या. कोरोनाचा पराभव करण्यासाठी जनतेने सरकारला मदत करावी, असे आवाहन त्यांनी जनतेला केले. यावेळी अचानक त्यांची मुलगी झोपेतून उठली आणि त्यांना हाक मारत होती. यावेळी जेसिंडा यांनी गोंधळून न जाता, तीला प्रेमाने आपल्या आजीसोबत झोपण्यास सांगितले. यानंतर मुलग फेसबूक लाईव्हमध्ये व्यत्यय आणल्याने त्यांनी जनतेची माफी मागितली.

यावेळी त्या जनेतला म्हणाल्या, की सध्या माझ्या मुलीजवळ माझी आई म्हणजेच तीची आजी आहे. तीच तीला सांभाळते. नाहीतर आतापर्यंत घरात वादळ उठलं असतं. तसेच फेसबूक लाईव्ह करण्यासाठी ही वेळ योग्य आहे का, माझ्या मुलीप्रमाणे तुमचेही मुले रात्री झोपेतून उठतात का, असा प्रश्न जेसिंडा यांनी जनतेला केला.

यातच पुन्हा जेसिंडा यांची मुलगी नीवने पुन्हा त्यांना हाक मारली आणि इतका वेळ का लागत असल्याचे विचारले. यावर त्यांनी आपल्याला आणखी थोडा वेळ लागेल, असे सांगत त्यांनी तीला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तीच्या हट्टापुढे त्यांना नमतं व्हावं लागलं. मला कार्यक्रम बंद करावा लागेल असे दिसत आहे. तीच्या झोपण्याची वेळ झाली असून ती मला सोबत घेऊनच झोपेल, असे त्या म्हणाल्या आणि जनतेची माफी मागत फेसबूक लाईव्ह बंद केले.

जेसिंडा आर्डन यापूर्वी चर्चेत आल्या होत्या. पंतप्रधान झाल्यानंतर कार्यालयातच त्यांनी बाळाला जन्म दिला होता. तसेच तीन महिन्यांच्या बाळाला घेऊन संयुक्त राष्ट्रांच्या सभेत सहभागी झाल्या होत्या. ख्राइस्टचर्च हल्ल्यानंतर त्यांचा वागण्यातील सच्चेपणा पाहायला मिळाला. देशातल्या एका भागात अनवाणी भटकणारी, भुकेली मुले पाहिल्यावर जेसिंडा यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा - न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा लग्नबंधनात, आधी बाळ नंतर लग्न, अशी आहे प्रेमकहाणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.