ETV Bharat / international

फक्त एक कोरोनाबाधित आढळला आणि पंतप्रधानांनी आख्ख्या देशावर लॉकडाऊन लादलं - न्यूझीलंड लॉकडाऊन

न्यूझीलंडमध्ये एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आणि पंतप्रधानांनी आख्ख्या देशावर लॉकडाऊन लादलं आहे. जॅसिंडा आर्डर्न यांनी वेलिंग्टन येथे पत्रकार परिषदेत देशात लॉकडाऊनची घोषणा केली.

Jacinda Ardern
जॅसिंडा आर्डर्न
author img

By

Published : Aug 18, 2021, 7:54 AM IST

वेलिंग्टन - न्यूझीलंड सरकारने देशात लॉकडाउन लादले आहे. ऑकलंड शहरात एका व्यक्तीचा कोविड -19 चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. न्यूझीलंडमध्ये 6 महिन्यांनंतर, एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. जॅसिंडा आर्डर्न यांनी वेलिंग्टन येथे पत्रकार परिषदेत देशात लॉकडाऊनची घोषणा केली.

ऑकलंडमध्ये एक आठवड्याचा लॉकडाऊन असेल तर उर्वरित देशात तीन दिवसांचा लॉकडाऊन असणार आहे. कोरोना मार्गदर्शक तत्त्वांच्या कडक अटी लागू केल्या आहेत. शाळा, कार्यालये आणि व्यवसाय सर्व बंद राहतील. अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. सुरुवातीला नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली तर ते फायदेशीर ठरेल, असे न्यूझीलंडच्या पंतप्रधान म्हणून जेसिंडा ऑर्डन यांनी म्हटलं.

मीडिया रिपोर्टनुसार, संक्रमित व्यक्तीचे वय 58 वर्षे आहे. संबंधित व्यक्ती गुरुवारपासून आजारी होते. चाचणी दरम्यान कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. संबंधित व्यक्तीने ज्या ठिकाणांना भेट दिली होती. त्या सर्व ठिकणी पाळत ठेवली जात आहे. . लोकांना घरून काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बाहेर जाण्याची गरज असेल तेव्हा फेस मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लॉकडाऊन वाढवण्यात येईल, या भितीने सुपरमार्केटमध्ये गर्दी वाढली. या प्रकरणात जलद आणि कठोर कारवाईची आवश्यकता आहे. कारण, संबंधित रुग्णांला डेल्टा विषाणूची लागण झाल्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने म्हटलं. न्यूझीलंडने आपल्या सीमेवर कडक नियम लागू केले आहेत. यामुळेच कोणताही सकारात्मक रुग्ण देशात पोहोचू शकला नाही. एका अर्थाने येथील सर्व सीमा बंद असल्याचे म्हणता येईल.

हेही वाचा - कोरोनाला दिलेल्या लढ्यामुळेच मिळाला ऐतिहासिक विजय - जॅसिंडा अर्डर्न

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.