बीजिंग- शनिवारी पूर्व चीनमध्ये गॅस वाहतूक करणाऱ्या टॅंकरचा स्फोट झाला. ही घटना वेनलिंग या शहरात घडली. या घटनेतील मृतांची संख्या 19 वर पोहोचली आहे.
टँकरच्या स्फोटाची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जवळपासच्या इमारतींना याचा फटका बसला आहे. या परिसरातील वाहने जळाली आहेत. या घटनेत जखमी झालेल्या 132 लोकांना उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
टँकरमधून द्रव स्वरूपातील वायूची वाहतूक करण्यात येत होती. शेनयांग-हाईकोउ एक्सप्रेसवेवर शनिवारी 4 वाजून 45 मिनिटांनी टँकरमधील वायूचा स्फोट झाला. हा भाग दक्षिण शांघाई मधील या झेजियांग प्रांतात येतो.
हायवेवर असणाऱ्या वर्कशॉप जवळच ही घटना घडल्यामुळे टँकरचा स्फोट झाल्यानंतर वर्कशॉप मध्येही स्फोट झाला झाला. या घटनेनंतर स्थानिक अग्निशमन दलाने मदतकार्य सुरू करून घटनास्थळावरून नागरिकांना बाहेर काढले, त्यापैकी जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसातील ही दुसरी घटना आहे.