प्योंगयांग - उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग यांच्या प्रकृतीविषयी जगभरातून याविषयी उलट-सुलट बातम्या आणि चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यांची प्रकृती नाजूक किंवा धोकादायकरीत्या गंभीर असल्याची बातमी पसरली होती. या बातमीचे खंडण अधिकारी मून जे-इन यांनी केले आहे. किम जोंग हे जिवंत आणि सुदृढ असून ते १३ एप्रिलपासून वॉनसन या ठिकाणी वास्तव्यास आहेत.
उत्तर कोरियाचं संस्थापक आणि त्यांचे आजोबा यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातही त्यांनी सहभाग घेतला नव्हता. त्यानंतर त्यांच्या आजारपणाविषयी चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान किम जोंग उनची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळून लावले होते. तसेच किम संदर्भात बातमी देणाऱ्या वृत्तसंस्थेवर त्यांनी टीका केली आहे.