ETV Bharat / international

पाकिस्तानात हिंदू मंदिराची तोडफोड; भारताने नोंदवला निषेध, हिंदूना संरक्षण देण्याची मागणी - पाकिस्तानात हिंदू मंदिरावर हल्ला

पाकिस्तानच्या पंजाब प्रातांतील हिंदू मंदिरावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. जमावाने मंदिरातील मुर्तीची तोडफोड केली आणि मंदिराचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. काही दिवसांपूर्वी एका लहान हिंदू मुलाने मुस्लिम मदरशामधील वाचनालयात लघुशंका केली होती. त्या घटनेची प्रतिक्रिया म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पाकिस्तान
पाकिस्तान
author img

By

Published : Aug 6, 2021, 7:34 AM IST

इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये हिंदूंच्या मंदिराना लक्ष्य करण्यात आल्याच्या अनेक घटना घडल्या आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रातांतील हिंदू मंदिरावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. जमावाने मंदिरातील मुर्तीची तोडफोड केली आणि मंदिराचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. काही दिवसांपूर्वी एका लहान हिंदू मुलाने मुस्लिम मदरशामधील वाचनालयात लघुशंका केली होती. त्या घटनेची प्रतिक्रिया म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

रहीम यार खान जिल्ह्यातील भोंग शहरातील गणेश मंदिरावर जमावाने बुधवारी हल्ला केला. हल्लेखोरांजवळ काठ्या, दगड आणि विटा होत्या. त्यांनी धार्मिक घोषणा देत मूर्तींची मोडतोड केली, तसेच मंदिराचा काही भाग जाळला. याप्रकरणी मुख्य न्यायाधीश अहमद आज सुनावणी करणार आहेत. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. सत्ताधारी पाकिस्तान तेहरीक-ई-इन्साफ पक्षाचे खासदार डॉ. रमेशकुमार वांकवानी यांनी मंदिरावरील हल्ल्याचे व्हिडीओ आपल्या टि्वटरवर शेअर केले आहेत.

परिसरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पाकिस्तान सरकारने अर्धसैनिक दल तैनात केले आहे. मंदिराची तोडफोड झाल्यानंतर भारताने गुरुवारी घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. तसेच मुख्यत्वे मुस्लिम पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदूंना संरक्षण देण्याची मागणी केली.

हिंदू मंदिराची तोडफोड झाल्याप्रकरणी भारताने नोंदवला निषेध

मदरशामधील वाचनालयात लघुशंका करणाऱ्या मुलाला गेल्याच आठवड्यात अटक करण्यात आली होती. त्याच्यावर ईश्वारनिंदा कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र अल्पवयीन असल्याने नंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले होते.

पाकिस्तानात हिंदू मंदिराची तोडफोड -

पाकिस्तानमध्ये हिंदूंच्या मंदिरांना लक्ष्य करण्यात आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यासंदर्भात लंडनस्थित पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्त्या अनिला गुलजार यांनी पाकिस्तान सरकारवर टीका केली आहे. पाकिस्तानात 828 पैकी फक्त 20 मंदिरेच बाकी आहेत, असे त्या म्हणाल्या. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या सिंध प्रदेशात हिंदू मंदिराची तोडफोड झाली होती. यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानातील अल्पसंख्याकाच्या सुरक्षतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

पाकिस्तानात अल्पसंख्यांक असुरक्षित -

तथापि, पाकिस्तानकडून नेहमीच भारतावर काश्मीरमधील अल्पसंख्यांकाचा प्रश्नांवरून टीका करण्यात येते. मात्र, पंतप्रधान इम्रान खान हे स्वत:च्या देशातील अल्पसंख्यांचे रक्षण करण्यात अपयशी ठरले आहेत. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानातील अनेक पुरातन हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आली आहे. इस्लामाबाद शहरात तर हिंदूंसाठी एकही मंदिर नाही. त्यामुळे शहरात मंदिर बांधण्याची मागणी पाकिस्तानातील हिंदू संघटनांकडून होत होती.

हेही वाचा - पाकिस्तानात आढळले 1 हजार 300 वर्ष जुने विष्णुचे मंदिर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.