नवी दिल्ली - जपानमधील क्योटो शहरात आज (बुधवार) भारत आणि जपानच्या परराष्ट्रमंत्र्यामध्ये महत्त्वाच्या सामरिक मुद्द्यांवर चर्चा झाली. गरीब देशांशी भारत आणि जपानचे संबंध वाढविण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. मुक्त व खुल्या इंडो पॅसिफिक महासागराची संकल्पना घेवून चीनला शह देण्यासाठी भारत, जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या चार देशांची काल क्योटो शहरात बैठक झाली. चीनच्या विस्तारवादी धोरणाला रोखण्यासाठी चार देश एकत्र आले आहेत.
-
Just concluded India-Japan Strategic Dialogue with FM @moteging. Conveyed warm birthday greetings. Discussions covered our cooperation in manufacturing, skills, infrastructure, ICT and health. Our special partnership can make a big difference in post-COVID recovery. pic.twitter.com/lm1tjhOzPG
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) October 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Just concluded India-Japan Strategic Dialogue with FM @moteging. Conveyed warm birthday greetings. Discussions covered our cooperation in manufacturing, skills, infrastructure, ICT and health. Our special partnership can make a big difference in post-COVID recovery. pic.twitter.com/lm1tjhOzPG
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) October 7, 2020Just concluded India-Japan Strategic Dialogue with FM @moteging. Conveyed warm birthday greetings. Discussions covered our cooperation in manufacturing, skills, infrastructure, ICT and health. Our special partnership can make a big difference in post-COVID recovery. pic.twitter.com/lm1tjhOzPG
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) October 7, 2020
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि जपानचे समकक्ष तोहिमित्सू मोटेगी यांच्यामध्ये द्विपक्षीय संबंधासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर बैठक झाली. चीनचे अमेरिका आणि शेजारी राष्ट्रांशी संबंध बिघडलेले असताना जागतिक स्तरावर क्वाड गट तयार होत आहे. यातील भारत एक महत्त्वाचा सदस्य आहे. तर जपानचाही चीनसोबत पूर्व समुद्रांतील बेटांवरून वाद सुरू आहे. त्यास भारत जपानच्या घनिष्ट संबंधांमुळे चीनचा जळफळाट सुरू आहे. क्योटो शहरात क्वाड देशांच्या बैठकीतून काहीही निष्पन्न होणार नाही, असे चिनी सरकारच्या अधिकृत ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्राने म्हटले आहे.
-
Explored further expansion of our third country collaboration, with focus on development projects. Reviewed global situation and developments pertaining to UN reform. Our shared commitment can help realise stability, security and prosperity in the Indo-Pacific.
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) October 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Explored further expansion of our third country collaboration, with focus on development projects. Reviewed global situation and developments pertaining to UN reform. Our shared commitment can help realise stability, security and prosperity in the Indo-Pacific.
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) October 7, 2020Explored further expansion of our third country collaboration, with focus on development projects. Reviewed global situation and developments pertaining to UN reform. Our shared commitment can help realise stability, security and prosperity in the Indo-Pacific.
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) October 7, 2020
भारत जपानमध्ये सामरिक संवाद सुधारण्याचा भाग म्हणून ही बैठक पार पडली. संयुक्त राष्ट्राच्या रचनेत बदल करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. त्याचबरोबर इंडो-पॅसिफिक महासागर क्षेत्रात दोन्ही देशात आणखी घनिष्ठ संबंध करण्यावर दोन्ही देशांत एकमत झाले. यासोबत इतर अनेक विषयांवर चर्चा झाली.
निर्मिती, कौशल्य विकास, बांधकाम, माहिती आणि संपर्कव्यवसस्था, आरोग्य या क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढविण्यावर चर्चा झाल्याचे एस. जयशंकर यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. कोरोनानंतरच्या काळात भारत-जपान मैत्रीमुळे मोठा फरक पडणार असल्याचे एस. जयशंकर म्हणाले.