हैदराबाद - कोरोना विषाणूमुळे जगभरात ३१ लाख ३८ हजार ४१३ जण बाधीत झाले आहेत. तर २ लाख १७ हजार ९८५ जण दगावले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे ९ लाख ५५ हजार ८२४ दण उपचारानंतर बरे झाले आहेत. सर्वात जास्त रुग्ण अमेरिकेत आढळून आले आहेत.
कोव्हीड १९ विषाणूच्या संसर्गाने काही व्यक्तींमध्ये सौम्य तर काहींमध्ये तीव्र लक्षणे दिसून येतात. आधीपासून आजारी किंवा व्याधींनी त्रस्त असलेल्या वयोवृद्ध रुग्णांना कोरोनाचा धोका सर्वात जास्त आहे. बुधवारी चीनमध्ये ६ बाहेर देशातून आलेल्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली. मात्र, एकही मृत्यू झाला नाही.
चीनमध्ये आढळलेल्या २२ रुग्णांपैकी २१ जण बाहेरच्या देशातून चीनमध्ये आलेले आहेत. तर गँगडॉन औद्योगिक परिसरात एका स्थानिक व्यक्तीला संसर्ग झाला. चीनमधील राष्ट्रीय आरोग्य विभागाने ही माहिती दिली. चीनमधून सुरुवात झालेल्या कोरोना विषाणूचे फक्त ६४७ रुग्ण चीनमध्ये अॅक्टीव्ह आहेत. तर १ हजार जण क्वारंटाईनमध्ये आहेत.
चीनमध्ये आत्तापर्यंत ४ हजार ६३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ८२ हजार ८५८ रुग्ण आढळून आले होते. प्रशासनाने संचारबंदीचे नियम शिथिल केले असले तरी विलगिकरणासाठी कडक नियम ठेवण्यात आले आहेत.