ढाका - बांगलादेशच्या राजधानीमध्ये नमाजाच्या वेळी मशिदीजवळ भूमिगत गॅस पाईपलाईनमधून वायूची गळती झाल्याने स्फोट झाल्याची घटना घडली आहे. यात किमान 11 जणांचा मृत्यू झाला असून 37 जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री नारायणगंज येथील मशिदीत नमाज पठणाच्या वेळी हा स्फोट झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जखमींना ढाका वैद्यकीय कॉलेज आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी लोकांचे शरीर जवळपास 90 टक्के जळाल्याचे डॉक्टारांनी सांगितले. बहुतेकांची प्रकृती चिंताजनक आहे. भूमिगत गॅस पाईपलाईनमधून वायूची गळती झाल्याने मशिदीमधील सहा एअर कंडिशनर फुटल्याची माहिती आहे.