ETV Bharat / international

नवाज शरीफ यांना पाकिस्तानच्या हवाली करा, इम्रान खान यांची इंग्लडकडे तिसऱ्यांदा मागणी

author img

By

Published : Oct 22, 2020, 5:03 PM IST

नवाज शरीफ यांच्या विरोधात पाकिस्तानी न्यायालयात भ्रष्टाचाराच्या प्रकरणात खटला सुरू आहे. तर एका प्रकरणात त्यांना तुरुंगवास झाला आहे. मात्र, उपचारासाठी इंग्लडला गेल्यानंतर ते अद्याप माघारी परतले नाहीत.

Nawaz Sharif
नवाज शरीफ

इस्लामाबाद - माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना पाकिस्ताकडे हस्तांतरित करा, अशी मागणी पंतप्रधान इम्रान खान यांनी इंग्लडला तिसऱ्यांदा केली आहे. शरीफ यांना पाकिस्तानी न्यायालयाने शिक्षा सुनावली असून तुरुंगात असताना ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे इंग्लडला उपचारासाठी गेले होते. मात्र, त्यांनी माघारी येण्यास नकार दिला आहे.

नोव्हेंबर २०१९ला नवाझ शरीफ इंग्लडला गेले आहेत. प्रकृती ढासळल्याने पुढील उपचारासाठी परदेशात जाण्यासाठी परवानगी त्यांनी मागितली होती. इम्रान खान सरकार त्यांना परवानगी देत नव्हते. मात्र, शरीफ यांना काही झाले, तर त्यास पाकिस्तान सरकार जबाबदार असेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानंतर त्यांना इंग्लंडला जाण्यास परवानगी देण्यात आली. परंतु, उपचारास गेल्यानंतर त्यांनी माघारी येण्यास नकार दिला.

भ्रष्टाचाराचे आरोप आणि अटक

एका ३४ वर्ष जुन्या भ्रष्टाचार प्रकरणात त्यांच्या शिक्षा झाली आहे. तर इतर प्रकरणात खटले सुरू आहेत. पाकिस्तानातील अकाऊंटीबिलीटी न्यायालयाने शरीफ यांच्याविरोधात अटक वॉरंटही जारी केले होते. तसेच त्यांच्या तिन्ही निवासस्थानी समन्स बजावण्यात आले होते. मात्र, शरीफ अद्यापही माघारी आले नाहीत. शरीफ यांनी तीन वेळा पाकिस्तानचे पंतप्रधानपद भूषविले आहे. मात्र, इम्रान खान सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी विरोधकांवरील जुन्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा तपास सुरू केला आहे.

पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी इम्रान खान सरकार आणि लष्कराविरोधात जनआंदोलन उभे केले आहे. या आंदोलनात ११ विरोधी पक्षांनी सहभाग घेतला असून त्यांच्याकडून देशभर सरकारविरोधात निदर्शने आणि आंदोलने सुरू आहे. त्यामुळे इम्रान खान सरकारपुढील अडचणी वाढल्या आहेत. इम्रान खान हे लष्कराने पंतप्रधान पदावर बसविलेले प्यादे असून खरी सत्ता लष्कराच्या हातात आहे. देशात खरी लोकशाही आणण्यासाठी इम्रान खान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. या आंदोलनाला शरीफ यांचा मोठा पाठिंबा असून ते इंग्लमधून व्हर्च्युअल सभा घेत आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा पाकिस्तानात आणण्यासाठी इम्रान खान प्रयत्न करत आहेत.

सफरद अटक प्रकरणावरून आंदोलन तीव्र

विरोधकांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी पाकिस्तान मुस्लीम लीग पक्षाच्या उपाध्यक्ष मरयम नवाज शरीफ यांचे पती सफरद यांना पाकिस्तानी लष्कराने अटक केले होते. त्यावरून पाकिस्तानातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. सिंध प्रांतात आंदोलनासाठी आले असता लष्कराने पोलिसांचा विरोध झुगारत बळजबळीने कराचीतील हॉटेलातून सफदर यांना अटक केली. एफआयआरवर सही करण्यासाठी सिंध पोलीस महानिरक्षकाला वेठीस धरण्यात आले होते. या घटनेनंतर अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दीर्घ रजेवर जाण्यासाठी अर्ज केला असून राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.