ETV Bharat / international

काबूल प्रसृती रुग्णालय दहशतवादी हल्ला; मृतांचा आकडा २४

author img

By

Published : May 13, 2020, 6:25 PM IST

तालिबान किंवा इस्लामिक स्टेट या दोहोंपैकी कुठल्याही संघटनेने अद्याप हल्ल्याची जबाबदारी घेतली नाही. मात्र, या दोन्ही संघटनांकडून वारंवार अफगाण लष्करावर हल्ले होत आहेत.

काबूल प्रसृती रुग्णालय दहशतवादी हल्ला; मृतांचा आकडा २४
काबूल प्रसृती रुग्णालय दहशतवादी हल्ला; मृतांचा आकडा २४

काबूल - अफगाणिस्तानातील काबूल येथील प्रसृती रुग्णालयात झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या आकड्यात वाढ झाली आहे. आतापर्यंत २४ लोकांचा हल्ल्यात मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन नवजात बालके, त्यांच्या आई आणि नर्स यांचा समावेश आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. मंगळवारी सकाळी दहशतवाद्यांनी दाश्ती बार्ची येथील या रुग्णालयात हल्ला केला. यानंतर बराच वेळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.

अफगाणी सुरक्षा दलांनी रुग्णालयातून कुटुंबांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यास मदत केली. 'डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स' संघटनेच्या मदतीने नवजात बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले तसेच नुकतीच प्रसूती झालेल्या मातांनाही सुखरुपरित्या बाहेर काढले. सुरुवातीला हल्ल्यात १६ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास १०० महिला आणि नवजात बाळांना सुखरुप बाहेर काढले असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, या हल्ल्यात २४ लोकांचा मृत्यू झाला असल्याचे उघड झाले आहे.

तालिबान किंवा इस्लामिक स्टेट या दोहोंपैकी कुठल्याही संघटनेने अद्याप हल्ल्याची जबाबदारी घेतली नाही. मात्र, या दोन्ही संघटनांकडून वारंवार अफगाण लष्करावर हल्ले होत आहेत. काबूलमधील सुरक्षा दलांवरही या दहशतवादी संघटनांकडून हल्ले होत असतात. आपल्या यामध्ये हात नसल्याचा दावा तालिबानने केला आहे, तर गेल्या काही दिवसात दाश्ती बार्ची या परिसरात इस्लामिक स्टेटकडून अनेक हल्ले घडवून आणले गेले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.