बिंजिंग - संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत आहे. चीनमध्ये झालेल्या कोरोनाच्या प्रसाराचे वृत्तांकन करणाऱ्या महिला पत्रकार गेल्या अनेक दिवसांपासून तुरुगांत बंद आहेत. झांग झान असे या धाडसी महिला पत्रकाराचे नाव आहे. तुरुंगातच त्यांनी उपोषण सुरू केली असून त्यांची तब्येत ढासळल्याची माहिती आहे. त्यांची तात्काळ सुटका करावी असे आवाहन पीडितेच्या कुटुंबाने मानवाधिकार गटांकडे केले आहे.
झांग झान माजी वकील आहेत. साथीच्या आजारासंदर्भात कव्हरेज करण्यासाठी त्या फेब्रुवारी 2020 मध्ये वुहानच्या दौऱ्यावर होते. कोरोना परिस्थिती हाताळण्यासंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांना प्रश्न केले. या घटनेचे त्यांनी व्हिडिओ शूट केले. यानंतर मे 2020 मध्ये त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि 4 वर्षांचा तुरूंगवासाची शिक्षा देण्यात आली.
आपल्या अटकेचा निषेध करण्यासाठी झांग यांनी उपोषण सुरू केलं आणि त्यांची प्रकृती अतिशय खालावली. तुरुंगामध्ये झांग यांचे वजन कमालीचे कमी झाले असून त्यांची प्रकृती बिघडली आहे. सध्याच्या परिस्थितीत त्या जास्त दिवस राहू शकणार नाहीत. झांग उपोषणाला बसल्याने त्याला जबरदस्तीने नाकातील नळीतून अन्न दिले जात आहे.