बीजिंग - चीनमध्ये ( Corona in Chine ) व्हिएतनाममधून आलेल्या ड्रॅगन फ्रूटमध्ये कोरोना व्हायरस ( Corona Virus ) असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. यानंतर प्रशासनाने देशभरातील सुपरमार्केट ( Super market Closed in Chine ) बंद केले आहेत. मात्र खाण्याच्या पदार्थांमधून कोरोनाचा प्रसार होत असल्याचे पुरावे अद्याप हाती आलेले नाहीत.
नऊ शहरात सापडले नमुने -
मिळालेल्या माहितीनुसार, व्हिएतनाममधून आयात केलेल्या ड्रॅगन फ्रूटमध्ये झेजियांग आणि जियांग्शी भागातील नऊ शहरांमध्ये कोरोनाव्हायरसचे नमुने सापडले असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.
फळ खरेदीदारांना स्वतःला विलगीकरणात ठेवण्याचे आदेश -
अधिकाऱ्यांनी आयात केलेल्या अन्न उत्पादनांची आपत्कालीन तपासणी सुरू केली आहे आणि फळ खरेदीदारांना स्वतःला विलगीकरणात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जरी अन्नातून कोरोना व्हायरस पसरल्याचा कोणताही पुरावा नसला तरी चीनचे आरोग्य अधिकारी सावधगिरी बाळगत आहेत. कारण देश विषाणूच्या लाटेशी झुंजत आहे.
चीनमध्ये ड्रॅगन फळांवर बंदी -
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात COVID-19 चे ट्रेस आढळून आल्याने चीनने यापूर्वी 26 जानेवारीपर्यंत व्हिएतनाममधून आयात केलेल्या ड्रॅगन फळांवर बंदी घातली होती.
ड्रॅगन फ्रूटच्या आयातीवर बंदी -
चीनला ड्रॅगन फ्रूट पाठवणाऱ्या लँग सोन प्रांतातील हुउ न्घी बॉर्डर गेटवर ही बंदी घालण्यात आली आहे. कंटेनर ट्रक परत पाठवण्यात आल्याने अधिकाऱ्यांनी तान थान्ह नावाच्या दुसर्या बॉर्डर गेटवरून ड्रॅगन फ्रूटच्या आयातीवर बंदी घातली आहे.
हेही वाचा - Bihar Man Took 11 Vaccine : बिहारच्या ब्रम्हदेवांनी कोरोना लसीचे एक, दोन नव्हे तर घेतले चक्क अकरा डोस