ETV Bharat / international

Bomb Blast in Peshawar Mosque : पेशावर येथील मशिदीत बॉम्बस्फोट; 30 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू - किस्सा ख्वानी मार्केटमध्ये बॉम्बस्फोट

पाकिस्तानच्या वायव्य शहरातील एका मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटात 30 जणापेक्षा अधिक लोक ठार ( blast in Peshawar mosque ) झाले आहेत. नमाजाच्या वेळी गर्दी असलेल्या मशिदीत स्फोट हा झाला आहे. 50पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. ( bomb explodes at mosque in northwestern city of Peshawar )

Blast in Peshawar Mosque
पेशावर येथील मशिदीत बॉम्बस्फोट
author img

By

Published : Mar 4, 2022, 4:07 PM IST

Updated : Mar 4, 2022, 4:20 PM IST

पेशावर (पाकिस्तान) : पाकिस्तानातील वायव्येकडील पेशावर शहरात शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी बॉम्बस्फोट ( peshawar bomb blast ) झाला आहे. गर्दीच्या मशिदीमध्ये बॉम्बस्फोट झाल्याने किमान 30पेक्षा जास्त जण ठार झाले आहेत. तर 50हून अधिक जण जखमी झाले आहेत.

  • Atleast 30 people killed and more than 50 injured in a bomb explosion during Friday prayers at a mosque in Peshawar, Pakistan: Geo News pic.twitter.com/ZMaIZ7UVOg

    — ANI (@ANI) March 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मदत कार्य युद्धपातळीवर सुरू -

मदत आणि बचाव कार्यात गुंतलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, किस्सा ख्वानी मार्केट ( Qissa Khwani bazaar ) परिसरातील जामिया मशिदीमध्ये नमाजदार शुक्रवारची नमाज अदा करत असताना हा स्फोट झाला. १० जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या स्फोटाची जबाबदारी तात्काळ कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही. तेथील 'डॉन' या मुख्य पत्रानुसार, आतापर्यंत 30 मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले आहेत.

हल्लेखोरांना रोखतांना एक पोलीस शहिद -

पोलीस अधिकारी एजाज अहसान यांनी सांगितले की, दोन हल्लेखोरांनी मशिदीत घुसण्याचा प्रयत्न केला आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांवर गोळीबार केला. त्यात एक पोलीस ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. गोळीबाराच्या घटनेनंतर हा स्फोट झाल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - Bihar Blast Update : भीषण स्फोटात 3 मजली इमारत जमीनदोस्त, 12 जणांचा मृत्यू, अनेक ढिगाऱ्याखाली अडकले

Last Updated : Mar 4, 2022, 4:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.