काबूल - अफगानिस्तानच्या सर-ए-पूल प्रांतांत एका रस्त्याच्या कडेला शक्तिशाली स्फोट झाला. या स्फोटात जवळपास १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अफगाण राष्ट्रीय लष्कर दलाच्या (एएनए) १० जवानांचा समावेश असून इतर ३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
तेथील टोलो प्रसारमाध्यमाने याबाबत माहिती दिली आहे. शनिवार झालेल्या या शक्तीशाली स्फोटात इतर तीन जण जखमी झाले आहेत. अद्याप या स्फोटाची तालिबानसह कोणत्याही संघटनेने जबाबदारी घेतलेली नाही. सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनीही या घटनेविषयी अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.
हेही वाचा - भारताच्या सीमेवर चीनकडून 60 हजार सैन्य तैनात; अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्याचा दावा