ETV Bharat / international

पाकिस्तान: लाहोरमधील स्फोटात १ ठार, ६ जखमी - लाहोर स्फोट

पाकिस्तानातील लाहोर शहरामध्ये झालेल्या स्फोटात १ जण ठार तर ६ जण जखमी झाले आहेत. इलेक्ट्रॉनिक शॉपमधील शीतगृहामध्ये गॅस भरत असताना हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

pak blast
पाकिस्तानात स्फोट
author img

By

Published : Dec 7, 2019, 11:24 PM IST

इस्लामाबाद - पाकिस्तानातील लाहोर शहरामध्ये झालेल्या स्फोटात १ जण ठार तर ६ जण जखमी झाले आहेत. इलेक्ट्रॉनिक शॉपमधील शीतगृहामध्ये गॅस भरत असताना हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. बॉम्बस्फोट असल्याची शक्यताही पोलीस पडताळून पाहत आहेत.

सायंकाळी ७.५० वाजता स्फोट झाल्याची माहिती पंजाब पोलिसांनी दिली. कॉम्प्रेसर फुटल्याने स्फोट झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. स्फोटानंतर पोलिसांनी परिसराला वेढा घातला आहे. तसेच बॉम्ब नाशक पथक आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. जखमींना जिन्ना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रयोग शाळेतून तपासणी करुण आल्यानंतर पुढील माहिती देण्यात येईल, असे पंजाब पोलिसांनी सांगितले आहे. मृत्यू झालेला व्यक्ती टेक्निशियन असल्याची माहिती पुढे आली आहे. लाहोरमध्ये मागील काही दिवसांत अनेक हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

Intro:Body:

पाकिस्तान: लाहोरमध्ये स्फोटात १ ठार तर ६ जखमी

इस्लामाबाद - पाकिस्तानातील लाहोर शहरामध्ये झालेल्या स्फोटात १ जण ठार तर ६ जण जखमी झाले आहेत. इलेक्ट्रॉनिक शॉपमधील शीतगृहामध्ये गॅस भरत असताना हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. बॉम्बस्फोट असल्याची शक्यताही पोलीस पडताळून पाहत आहेत.

सायंकाळी ७.५० वाजता स्फोट झाल्याची माहिती पंजाब पोलिसांनी दिली. कॉम्प्रेसर फुटल्याने स्फोट झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. स्फोटानंतर पोलिसांनी परिसराला वेढा घातला आहे. तसेच बॉम्ब नाशक पथक आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. जखमींना जिन्ना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

प्रयोग शाळेतून तपासणी करुण आल्यानंतर पुढील माहिती देण्यात येईल, असे पंजाब पोलिसांनी सांगितले आहे. मृत्यू झालेला व्यक्ती टेक्निशियन असल्याची माहिती पुढे आली आहे.  लाहोरमध्ये मागील काही दिवसांत अनेक हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.   

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.