ETV Bharat / international

जगभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत... राज्यात ठिकठिकाणी करण्यात आली विद्युत रोषणाई - सिडनी नववर्ष २०२० स्वागत

जगभरात नववर्षाच्या स्वागताचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. पूर्वेकडील काही देशांमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसून येत आहे. राज्यात गेटवे ऑफ इंडियासह अनेक ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.

Australia Sydney Harbour New year 2020 celebrations
ऑस्ट्रेलियामध्ये जल्लोषात झाले नववर्षाचे स्वागत; भारतातही उरले अवघे काही तास..
author img

By

Published : Dec 31, 2019, 7:17 PM IST

Updated : Jan 1, 2020, 9:47 AM IST

मुंबईमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी 'गेटवे ऑफ इंडिया'वर काल (मंगळवार) लोकांनी मोठी गर्दी केली होती.

हाँगकाँग आणि थायलंडमध्येही नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. हाँगकाँगच्या व्हिक्टोरिया हार्बरवर, तर थायलंडच्या शाओ फ्राया नदीवर आकर्षक आतिषबाजी करण्यात आली..

ऑस्ट्रेलियापाठोपाठ न्यूझीलंडच्या ऑकलँडमध्येही आतिषबाजीमध्ये नववर्षाचे स्वागत करण्यात आले..

ऑस्ट्रेलियामध्ये २०२०चे दिमाखात आगमन झाले. ऑस्ट्रेलियाची राजधानी सिडनीमध्ये शानदार आतिषबाजीने नववर्षाचे स्वागत करण्यात आले आहे. सिडनी हार्बरवर दरवर्षी साजरा करण्यात येणारा हा नेत्रदीपक सोहळा जगभरातील अब्जावधी लोकांकडून पाहिला जातो.

ऊगवत्या सूर्याचा देश म्हणून प्रसिद्ध असलेल्या जपानमध्ये नवीन वर्ष साजरे करण्यात आले. टोकियोमधील ही काही दृष्ये..

विरोधानंतरही पार पडला सोहळा..

सिडनीमधील ऑपेरा हाऊस हे दरवर्षी होणाऱ्या या फटाक्यांच्या आतिषबाजीसाठी प्रसिद्ध आहे. यावर्षी हा सोहळा वादामध्ये अडकला होता. कित्येक सेलिब्रिटीज आणि सामाजिक संस्थांनी पर्यावरणाच्या आणि प्रदूषणाच्या दृष्टीने विचार करत, हा सोहळा रद्द करावा अशी मागणी केली होती.

तसेच, गेले कित्येक आठवडे ऑस्ट्रेलियामधील जंगलांना आग लागली आहे, जी अजूनही आटोक्यात आली नाहीये. आजच, देशाच्या पर्थ शहरातील साधारणपणे चार हजार लोक हे आगीच्या कचाट्यात अडकल्याचे वृत्त समोर आले होते. यात दोघांचा मृत्यू झाल्याची माहितीही मिळाली आहे. असे असताना, नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आतिषबाजी कशाला असा प्रश्न सामाजिक संस्था आणि पर्यावरणवादी लोक उपस्थित करत होते. मात्र, या विरोधानंतरही, हा सोहळा पार पाडण्यास परवानगी देण्यात आली.

हेही वाचा : पाकिस्तान तालिबानचा म्होरक्या अफगाणिस्तानमध्ये ठार

Intro:Body:

ऑस्ट्रेलियामध्ये जल्लोषात झाले नववर्षाचे स्वागत; भारतातही उरले अवघे काही तास..

सिडनी - भारतात अजूनही २०१९ हेच वर्ष सुरू आहे. मात्र, ऑस्ट्रेलियामध्ये २०२०चे दिमाखात आगमन झाले आहे. ऑस्ट्रेलियाची राजधानी सिडनीमध्ये शानदार आतिषबाजीने नववर्षाचे स्वागत करण्यात आले आहे. सिडनी हार्बरवर दरवर्षी साजरा करण्यात येणारा हा नेत्रदीपक सोहळा जगभरातील अब्जावधी लोकांकडून पाहिला जातो.

विरोधानंतरही पार पडला सोहळा..

सिडनीमधील ऑपेरा हाऊस हे दरवर्षी होणाऱ्या या फटाक्यांच्या आतिषबाजीसाठी प्रसिद्ध आहे. यावर्षी हा सोहळा वादामध्ये अडकला होता. कित्येक सेलिब्रिटीज आणि सामाजिक संस्थांनी पर्यावरणाच्या आणि प्रदूषणाच्या दृष्टीने विचार करत, हा सोहळा रद्द करावा अशी मागणी केली होती.

तसेच, गेले कित्येक आठवडे ऑस्ट्रेलियामधील जंगलांना आग लागली आहे, जी अजूनही आटोक्यात आली नाहीये. आजच, देशाच्या पर्थ शहरातील साधारणपणे चार हजार लोक हे आगीच्या कचाट्यात अडकल्याचे वृत्त समोर आले होते. यात दोघांचा मृत्यू झाल्याची माहितीही मिळाली आहे. असे असताना, नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आतिषबाजी कशाला असा प्रश्न सामाजिक संस्था आणि पर्यावरणवादी लोक उपस्थित करत होते. मात्र, या विरोधानंतरही, हा सोहळा पार पाडण्यास परवानगी देण्यात आली.

Conclusion:
Last Updated : Jan 1, 2020, 9:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.