ETV Bharat / international

Indonesia earthquake : इंडोनेशियात भूकंपामुळे 10 लोकांचा मृत्यू - इंडोनेशियात 10 मृत्यू

शुक्रवारी सकाळी पश्चिम सुमात्रा प्रांताला ( West Sumatra province ) ६.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला.शनिवारी उशिरा दोन मृतदेह बाहेर काढले, असे राष्ट्रीय आपत्ती निवारण संस्थेचे प्रवक्ते अब्दुल मुहारी यांनी सांगितले.

Indonesia earthquake
Indonesia earthquake
author img

By

Published : Feb 27, 2022, 7:07 PM IST

जकार्ता : इंडोनेशियातील सुमात्रा बेटावरील ( Sumatra island ) रविवारी झालेल्या भूकंपात ( Indonesia earthquake) 10 लोकांचा मृत्यू झाला. सुमारे 400 लोक जखमी झाले आणि हजारो विस्थापित झाल्याचे आपत्ती अधिकाऱ्याने सांगितले.

शुक्रवारी सकाळी पश्चिम सुमात्रा प्रांताला ( West Sumatra province ) ६.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला.शनिवारी उशिरा दोन मृतदेह बाहेर काढले, असे राष्ट्रीय आपत्ती निवारण संस्थेचे प्रवक्ते अब्दुल मुहारी यांनी सांगितले. पासमन जिल्ह्यात सहा आणि पश्चिम पासमान जिल्ह्यात ( West Pasaman district ) चार जणांचा मृत्यू झाला, असेही ते म्हणाले. मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेल्या लोकांचा अजूनही शोध सुरू आहे.

388 लोक जखमी

भूकंपामुळे किमान 388 लोक जखमी झाले. याचे धक्के मलेशिया आणि सिंगापूरपर्यंत ( Malaysia and Singapore ) जाणवले आणि सुमारे 42 लोक गंभीर जखमींवर उपचार घेत असल्याचे मुहारी म्हणाले. 13,000 हून अधिक लोकांनी विस्थापन केले. पासमान आणि पश्चिम पासमन जिल्ह्यांत 1,400 हून अधिक घरे आणि इमारतींचे नुकसान झाले आहे, मुहारी यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

ज्वालामुखीचा वारंवार फटका

इंडोनेशिया पॅसिफिकला जोडणार्‍या ज्वालामुखी आणि फॉल्ट लाइनच्या "रिंग ऑफ फायर" वर स्थित असल्यामुळे भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक आणि त्सुनामी यांचा वारंवार फटका बसतो. शेवटचा मोठा भूकंप जानेवारी 2021 मध्ये झाला होता तेव्हा 6.2 तीव्रतेच्या भूकंपात किमान 105 लोक ठार झाले आणि सुमारे 6,500 जखमी झाले. पश्चिम सुलावेसी प्रांतातील मामुजू आणि माजेने Mamuju and Majene जिल्ह्यांमध्ये 92,000 हून अधिक लोक विस्थापित झाले. 2004 मध्ये इंडोनेशियामध्ये हिंदी महासागर भूकंप आणि त्सुनामीने डझनभर देशांमध्ये सुमारे 230,000 लोक मारले गेले.

हेही वाचा - Russia Missile Attack in Kiev : कीवमधील इमारतीवर क्षेपणास्त्र हल्ला; पाहा, थरकाप उडवणारा VIDEO

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.