ETV Bharat / international

पाकिस्तानने पुन्हा खुपसलं नाक; सीएएवरून मोदींवर केली टीका - CAA violence

पाकिस्तानमधील शीख धर्मीयांचे पवित्रस्थळ गुरू ननकाना देव दरबार येथील प्रकरणाला वेगळे वळण देण्याच्या प्रयत्नात इम्रान खान तोंडघशी पडले.

इम्रान खान
इम्रान खान
author img

By

Published : Jan 4, 2020, 9:07 PM IST

नवी दिल्ली - पाकिस्तानमधील शीख धर्मीयांचे पवित्रस्थळ गुरू ननकाना देव दरबार येथील हल्ला प्रकरणाला वेगळे वळण देण्याच्या प्रयत्नात शुक्रवारी इम्रान खान तोंडघशी पडले. मात्र एकदा तोंडावर आपटूनही पाकिस्तानचे मन अजून भरलेले नाही. इम्रान खान यांनी आज पुन्हा नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून भारतावर टीका केली आहे.

  • Indian police brutality reaches new lows as its pogrom of Muslims in India continues as part of fascist Modi Govt's ethnic cleansing agenda https://t.co/BRI9LRHMX3

    — Imran Khan (@ImranKhanPTI) 4 January 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी टि्वट करत भारतावर टीका केली आहे. भारतामधील पोलिसांची क्रूरता अगदी खालच्या पातळीला गेली आहे. फॅसिस्ट मोदी सरकार आपल्या अजेंड्यानुसार भारतातील मुस्लिमांना लक्ष्य करत पद्धतशीरपणे संपवत आहे, असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले.
इम्रान खान यांनी शुक्रवारी पाकिस्तानातील ननकाना साहिब गुरुद्वारामध्ये झालेल्या तोडफोडीवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न या ट्विटच्या माध्यमातून केला आहे. नागरिकत्व सुधारणा आंदोलनावरून भारतात चालू असलेल्या आंदोलनाचा व्हिडिओ म्हणून त्यांनी बांगलादेशातील व्हिडिओ शेअर केला. उत्तरप्रदेशात पोलीस मुस्लिमांवर हल्ला करत आहेत. मुस्लिमांना नष्ट करण्याची मोदींची जी योजना आहे, तिचाच हा भाग आहे, असे शीर्षक त्यांनी व्हिडिओला दिले.
मात्र, इम्रान खान त्यांचा हा दावा फोल ठरला. हे व्हिडिओ बांगलादेशातील असल्याचे समोर आले आहे. 'फेक व्हिडिओ' असल्याचे समजताच इम्रान खान यांनी ट्विटरवरून व्हिडिओ काढून टाकला. जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतावर जोरदार टीका केली. त्यानंतर एनआरसी आणि आता सीएएवरून इम्रान खान यांनी भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये नाक खुपसून पुन्हा एकदा चोंबडेपणा केला आहे.

Intro:Body:

पाकिस्तानने पुन्हा खुपसलं नाक; सीएएवरून मोदींवर केली टीका

नवी दिल्ली - पाकिस्तानमधील शीख धर्मीयांचे पवित्रस्थळ गुरू ननकाना देव दरबार येथील प्रकरणाला वेगळे वळण देण्याच्या प्रयत्नात इम्रान खान तोंडघशी पडले. मात्र एकदा तोंडावर आपटूनही पाकिस्तानचे मन अजून भरलेले नाही. इम्रान खान यांनी आज पुन्हा नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून भारतावर टीका केली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी टि्वट करत भारतावर टीका केली आहे. भारतामधील पोलिसांची क्रूरता अगदी खालच्या पातळीला गेली आहे.  फॅसिस्ट मोदी सरकार आपल्या अजेंडयानुसार भारतातील मुस्लिमांना लक्ष्य करत पद्धतशीरपणे संपवत आहे, असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले.

इम्रान खान यांनी शुक्रवारी पाकिस्तानातील नानकाना साहिब गुरुद्वारामध्ये झालेल्या तोडफोडीवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न केला. नागरिकत्व सुधारणा आंदोलनावरून भारतात चालू असलेल्या आंदोलनाचा व्हिडिओ म्हणून त्यांनी बांगलादेशातील व्हिडिओ शेअर केला.

उत्तरप्रदेशात पोलीस मुस्लिमांवर हल्ला करत आहेत. मुस्लिमांना नष्ट करण्याची मोदींची जी योजना आहे, तिचाच हा भाग आहे, असे शीर्षक त्यांनी व्हिडिओला दिले. मात्र, त्यांचा हा दावा फोल ठरला. हे व्हिडिओ बांगलादेशातील असल्याचे समोर आले आहे. 'फेक व्हिडिओ' असल्याचे समजताच इम्रान खान यांनी ट्विटरवरून व्हिडिओ काढून टाकले

जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान भारतावर जोरदार टीका केली. त्यानंतर एनआरसी आणि आता सीएएवरून इम्रान खान यांनी भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये नाक खुपसुन पुन्हा एकदा चोंबडेपणा केला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.