काबुल (अफगाणिस्तान)- देशाच्या राजधानीत अफगाणी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची हत्या करण्यात आली. स्थानिक माध्यमांच्या अहवालात याचा खुलासा झाला आहे.
सिन्हुआने दिलेल्या वृत्तानुसार, अब्दुल जमील यांना रहमान मीनाजवळील पोलिस जिल्हा 8 मधील मशिदीबाहेर शुक्रवारच्या नमाजानंतर गोळ्या घालून ठार मारण्यात आले.
हेही वाचा - अफगाण सैन्याच्या छाप्यात 25 तालिबानी दहशतवादी ठार
आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. तथापि, अफगाण प्रशासन या हल्ल्यांना तालिबानी दहशतवाद्यांच्या कारवाया म्हणून पाहात आहे.
अलीकडच्या वर्षांत या दहशतवाद्यांनी बर्याच नागरिकांना आणि सैन्य अधिकाऱ्यांना लक्ष्य केले आहे. ते सामान्यत: सरकारी नोकर, नाटो (लष्करी संस्था) आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सैन्याला लक्ष्य करतात.
अधिकृत आकडेवारीनुसार नोव्हेंबर महिन्यात अफगाणिस्तानात झालेल्या या लक्ष्यित हल्ल्यांमध्ये जवळपास 44 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, बरेच लोक जखमीही झाले आहेत.
हेही वाचा - चीनमध्ये खाणीतील अपघातात 23 कामगार ठार, एकाला वाचवण्यात यश