ETV Bharat / international

अफगाण सैन्याकडून 5 तालिबान्यांचा खात्मा

author img

By

Published : Oct 28, 2020, 8:11 PM IST

'अलीकडेच 5 हजार तालिबानी कैद्यांमध्ये सुटका करण्यात आलेल्या तालिबानी कमांडर अहमद शाहला काल शहार-ए-सफा जिल्ह्यातील कलत-ए गिलझाय (जबूल प्रांताची राजधानी) येथे गोळ्या घालून ठार मारण्यात आले,' असे कोची यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. यात आणखी दोन तालिबानी सैनिक जखमी झाले आहेत.

तालिबान्यांचा खात्मा न्यूज
तालिबान्यांचा खात्मा न्यूज

काबूल - दक्षिण जाबुल प्रांतामध्ये झालेल्या चकमकीत काबूलमधील अधिकाऱ्यांनी अमेरिकेसह करार केल्यानंतर सोडलेल्या कैद्यांमधील कमांडरसह पाच तालिबानी अतिरेकी ठार झाल्याची माहिती स्थानिक पोलीस प्रमुख हेकमतुल्लाह कोची यांनी बुधवारी दिली.

'अलीकडेच 5 हजार तालिबानी कैद्यांमध्ये सुटका करण्यात आलेल्या तालिबानी कमांडर अहमद शाहला काल शहार-ए-सफा जिल्ह्यातील कलत-ए गिलझाय (जबूल प्रांताची राजधानी) येथे गोळ्या घालून ठार मारण्यात आले,' असे कोची यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. यात आणखी दोन तालिबानी सैनिक जखमी झाले आहेत.

जबुल पोलीस प्रमुखांच्या म्हणण्यानुसार, अफगाण सुरक्षा दलाच्या स्थानिक चौकीवर हल्ला केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. यात तालिबानी अतिरेकी ठार झाले.

ईशान्य अफगाणिस्तान प्रांतातील कुंडुझ प्रांतातील एका वेगळ्या घटनेत तालिबानमध्ये झालेल्या स्फोटात पाच ठार तर, 10 जण जखमी झाले आहेत.

'काल उशिरा कुंडुझच्या 8 व्या जिल्ह्यातील तारनाब भागात झालेल्या बॉम्बस्फोटात कमांडर फरीद मोहम्मदसह पाच तालिबानी दहशतवादी ठार झाले आणि पाच जण जखमी झाले,' असे अफगाण सैन्याच्या 217 व्या पमीर कॉर्प्सने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, तालिबान्यांनी अद्याप या दोन्ही घटनांसंबंधी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.