पेशावर- पेशावर येथील मदरशात झालेल्या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 166 जण जखमी झाले होते. यासंदर्भात 55 जणांना पेशावर पोलिसांनी अटक केली आहे. जामिया झुबेरिया मदरसा आणि त्यालगतच्या परिसरातील दिर कॉलनीमध्ये रॅपिड रिस्पॉन्स फोर्स, लेडीज पोलीस आणि बॉम्ब डिस्पोजल युनिटच्यावतीने सुरू असलेल्या या कारवाई दरम्यान 55 जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पेशावर पोलिसांनी बुधवारी दिली.
या संशयितांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले असून दहशतवाद विरोधी विभागानेही मंगळवारी झालेल्या बॉम्बस्फोटासंदर्भात अज्ञात दहशतवाद्यांविरूद्ध एफआयआर नोंदवला आहे. या स्फोटात 5 किलो स्फोटके वापरली गेली असल्याची माहिती बॉम्ब डिस्पोजल पथकाचे सहायक महानिरीक्षक शफकत मलिक यांनी दिली. या घटनेवेळी मदरशात 40 ते 50 मुले उपस्थित असल्याची माहिती अशी माहिती द एक्सप्रेस ट्रिब्यूनने दिली.