इस्लामाबाद - पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात एका ग्रेनेड हल्ल्यात दोन सुरक्षा कर्मचार्यांसह 14 जण जखमी झाले.
'अर्धसैनिक दलाचे एक वाहन मंगळवारी सुरब शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेतून जात असताना त्याच्यावर हल्ला झाला. जखमींमध्ये बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या व्यक्तींचाही समावेश आहे, असे वृत्त वृत्तसंस्था सिन्हुआने स्थानिक माध्यमांच्या हवाल्याने दिले आहे.
हेही वाचा - पाकिस्तानमध्ये झालेल्या आयईडी स्फोटात 2 ठार, 8 जखमी
जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्यांच्या स्थितीविषयी माहिती कळू शकली नाही.
पोलिस आणि सुरक्षा दलाने तपासकार्यासाठी हा परिसर बंद ठेवला होता.
अद्याप कोणत्याही गटाने किंवा व्यक्तीने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
हेही वाचा - हेल्मंड : रस्त्याकडेला झालेल्या बॉम्बस्फोटात अफगाण सुरक्षा अधिकाऱ्याचा मृत्यू