ETV Bharat / international

आश्चर्य! आईने घेतली लस तर कोरोना अँटीबॉडीजसह बाळाचा जन्म

author img

By

Published : Mar 19, 2021, 2:37 PM IST

Updated : Mar 19, 2021, 2:53 PM IST

अमेरिकामधील फ्लोरिडात एका बाळाने थेट कोरोना विषाणू अँटीबॉडीजसहच जन्म घेतला आहे. नुकत्याच जन्मलेल्या मुलीच्या शरीरात कोरोना विषाणुंविरूध्दच्या रोगप्रतिकारक पेशी (अँटीबॉडिज) सापडल्या असल्याचा दावा अमेरिकेतील बालरोग तज्ज्ञांनी केला आहे.

अमेरिका न्यूज
अमेरिका न्यूज

न्यूयॉर्क - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक देशांमध्ये कोरोना लसीकरण सुरू आहे. कोरोनासंदर्भातील अँटीबॉडीजवरही काम सुरू आहे. अशातच आता एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट घडली आहे. एका बाळाने थेट कोरोना विषाणू अँटीबॉडीजसहच जन्म घेतला आहे.

अमेरिकेत नुकत्याच जन्मलेल्या मुलीच्या शरीरात कोरोना विषाणुंविरूध्दच्या रोगप्रतिकारक पेशी (अँटीबॉडिज) सापडल्या असल्याचा दावा अमेरिकेतील बालरोग तज्ज्ञांनी केला आहे. अशाप्रकारची ही पहिलीच घटना आहे. मुलीच्या आईला कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला होता. त्यामुले मुलीमध्ये कोरोनाविरोधात अँटीबॉडी तयार झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे.

38 आठवड्यांची गर्भवती असताना संबंधित महिलेला मॉडर्ना लसीचा पहिला डोस देण्यात आला होता. लसीचा पहिला डोस घेतल्याच्या तीन आठवड्यांनंतर, महिलेने मुलीला जन्म दिला. मुलगी पूर्णपणे निरोगी आहे. मुलीची चाचणी केल्यानंतर तीच्या रक्तामध्ये अँटीबॉडिज आढळल्या आहेत.

अँटीबॉडिज आईकडून बाळाकडे हस्तांतरित -

कोरोनाविरोधातील अँटीबॉडिज आईकडून बाळाकडे हस्तांतरित करणारे जगातील हे पहिलेच प्रकरण आहे, असे अमेरिकेतील फ्लोरिडा अटलांटिक युनिव्हर्सिटीच्या संशोधनात सहभाग घेतलेले बालरोग तज्ञ पॉल गिलबर्ट आणि चाड रुडनिक यांनी सांगितले. 28 दिवसांच्या लसीकरण प्रोटोकॉलनुसार महिलेला लसचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

हेही वाचा - महाराष्ट्र-मध्य प्रदेश बससेवा बंद, शिवराज सिंह यांनी घेतला निर्णय

Last Updated : Mar 19, 2021, 2:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.