वॉशिंग्टन : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन ( Russian President Vladimir Putin ) यांनी नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (नाटो) ( North Atlantic Treaty Organization ) देशांमध्ये प्रवेश केल्यास अमेरिका हस्तक्षेप करेल, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी म्हटले आहे. पुतीन यांच्याशी बोलण्याची त्यांची कोणतीही योजना नाही, परंतु युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी बोलणे झाले आहे. युक्रेनियन लोकांचे दुःख कमी करण्यासाठी अमेरिका मानवतावादी मदत देईल असे आश्वासन त्यांनी ( Joe Biden On Russia Ukraine Crisis ) दिले.
आता थांबवले नाही तर..
बिडेन यांनी गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये ( White House USA ) पत्रकार परिषदेत सांगितले की, 'जर पुतिन नाटो देशांमध्ये प्रवेश करत असतील तर आम्ही हस्तक्षेप करू. मला फक्त एकाच गोष्टीची खात्री आहे की, आपण त्यांना आता थांबवले नाही तर त्यांना प्रोत्साहन मिळेल. आता त्यांच्यावर ( रशिया ) कडक निर्बंध लादले नाहीत तर त्यांना प्रोत्साहन मिळेल. यादरम्यान बिडेन यांनी रशियावर अनेक मोठे निर्बंध लादण्याची घोषणा केली. याने आता मोठ्या संघर्षाचे स्वरूप धारण केल्याचे ते म्हणाले.
युरोपमध्ये अतिरिक्त सैन्य तैनात
युक्रेनवर रशियाच्या आक्रमणादरम्यान, अमेरिकेने आपल्या नाटो सहयोगींच्या संरक्षणासाठी, विशेषतः पूर्व युरोपमध्ये अतिरिक्त सैन्य तैनात केले आहे. युक्रेनमध्ये पुतिन यांच्या महत्त्वाकांक्षा प्रचंड असल्याचा दावा बिडेन यांनी केला. विशेष म्हणजे रशियन सैन्याने गुरुवारी युक्रेनविरुद्ध लष्करी कारवाई सुरू केली, जी शुक्रवारीही सुरूच आहे.